CBSE दहावीच्या निकालात मुलींची बाजी, कुठे पाहाल निकाल?

सीबीएसई दहावीच्या परीक्षेत एकूण 93.6 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुलींचा निकाल मुलांहून चांगला आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईने आज 13 मे रोजी दुपारी 1 वाजता सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर केला. CBSC बोर्डातून दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी आपला निकाल https://cbseresults.nic.in या संकेतस्थळावर तपासू शकता. सीबीएसई दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर यातील रिकाम्या रखान्यात प्रविष्ठ करा. 

सीबीएसई दहावीच्या परीक्षेत एकूण 93.6 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुलींचा निकाल मुलांहून चांगला आला आहे. यंदाच्या वर्षी 94.75 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बोर्डाने सीबीएसई बारावीच्या घोषणेनंतर दहावीचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बारावीत 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

नक्की वाचा - देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली

यंदाच्या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं. सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा लवकर संपली होती. सीबीएसई दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्चपर्यंत सुरू होती. यंदाच्या वर्षी सीबीएसई परीक्षेत 39 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.  

येथे पाहा निकाल...

किती विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून जास्त स्कोअर केला?
सीबीएसई दहावी परीक्षेत 2,12,384 विद्यार्थ्यांनी 90 टक्के मिळवले आहेत. सीबीएसई दहावीच्या परीक्षात 95 टक्क्यांहून अधिक मार्क मिळविणाऱ्यांची संख्या 47,983 इतकी आहे. 

Advertisement

सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट  cbse.gov.in वर जा. होमपेजवरील रिझल्ट सेक्शनवर क्लिक करा. यानंतर Class X) Results 2024 Announced लिंकवर क्लिक करा. आता विद्यार्थ्यांनी हजेरी क्रमांक, शाळेचा क्रमांक किंवा अॅडमिट कार्ड दाखल करा. यानंतर दहावीचा निकाल स्क्रिनवर दिलेस. आता दहावीचा निकाल चेक करू शकता आणि प्रिंटही घेऊ शकता.