
CBSE Class 10th, 12th Supplementary Exam 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा 2025 साठी अर्ज करण्याची आज, 17 जून, अंतिम तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांना या वर्षीच्या सीबीएसई दहावी, बारावी बोर्डाच्या 2025 च्या निकालात कंपार्टमेंट आले आहे किंवा ज्यांना एखाद्या विषयात गुण वाढावे असे वाटत असेल तर ते या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. सीबीएसई पुरवणी परीक्षेच्या एलओसीसाठी (List of Candidates) विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत वेबसाइट भेट देऊ शकतात. विलंब शुल्कासह 19 जून 2025 पर्यंत एलओसी जमा करता येईल.
सीबीएसई पुरवणी परीक्षा 2025 साठी कोणते विद्यार्थी पात्र आहे ?
CBSE Supplementary Exam 2025 साठी केवळ तेच विद्यार्थी पात्र असतील ज्यांच्या नुकत्याच झालेल्या दहावी किंवा बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या निकालात 'कंपार्टमेंट' असे मार्क करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना एलओसी जमा करण्यासाठी त्यांच्या शाळेत जावे लागेल. अशा विद्यार्थ्यांची वेळेवर नोंदणी करण्याची जबाबदारी शाळांची आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावे एलओसीद्वारे जमा केली जातील, त्यांनाच पुरवणी परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल.
सीबीएसई पुरवणी परीक्षा 2025 साठी किती फी भरावी लागेल ?
शाळांना पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी आणि एलओसी जमा करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड (CBSE Affiliation Number) वापरावा लागेल.सीबीएसई दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी 17 जूनपर्यंत प्रति विषय 300 रुपये शुल्कासह अर्ज करू शकता. तर, 2000 रुपये विलंब शुल्कासह विद्यार्थी 19 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. दृष्टीहीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.
सीबीएसई बोर्ड पुरवणी परीक्षा 2025 कधी होणार?
सीबीएसई बोर्ड पुरवणी परीक्षा 15 जुलै रोजी होणार आहे. सीबीएसई बोर्ड बारावीच्या सर्व वियांच्या पुरवणी परीक्षा एकाच दिवशी होतील. सीबीएसईने दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची डेटशीट अद्याप जारी करण्यात आलेली नाही. मात्र ती लवकरच केली जाईल अशी शक्यता आहे. सीबीएसई पुरवणी परीक्षा 2024-2025 च्या शैक्षणिक सत्राच्या अभ्यासक्रमानुसार असतील, हा अभ्यासक्रम cbseacademic.nic.in वर उपलब्ध आहे. सीबीएसई पुरवणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) जुलै महिन्याच्या सुरुवातीला जारी केले जातील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world