पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांचं निधन

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आणि अर्थशास्त्रज्ञ बिबेक देबरॉय यांचं वयाच्या 69 व्या वर्षी निधन झालं.

जाहिरात
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आणि अर्थशास्त्रज्ञ बिबेक देबरॉय यांचं वयाच्या 69 व्या वर्षी निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बिबेक देबरॉय यांच्या निधनाबाबत पोस्ट शेअर केली आहे. यावेळी मोदींनी लिहिले की, मी डॉ. देबरॉय यांनी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांची अंतर्दृष्टी आणि शैक्षणिक चर्चेदरम्यान त्यांनी हिरिरीने घेतलेला सहभाग माझ्या लक्षात राहील. त्यांच्या निधनाने मी दु:खी आहे. त्यांचे कुटुंब आणि मित्रांना माझी सहानुभूती. ओम शांती!

डॉ. बिबेक देबरॉय एक प्रखर विद्वान होते. ते अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृती, राजकीय, अध्यात्म आणि अन्य विविध क्षेत्रात पारंगत होते. आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या बौद्धिक कॅनव्हासवर छाप सोडली आहे. सार्वजनिक नीतीमधील योगदानाव्यतिरिक्त त्यांनी प्राचीन ग्रंथांवर काम केलंय आणि तरुणांना सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिलंय.