Cheapest Liquor In India : भारताच्या प्रत्येक राज्यात दारूच्या किंमती वेगवेगळ्या असतात. काही राज्यांमध्ये एक बिअरची बॉटल 120 रुपयांना मिळते, तर तीच बॉटल काही राज्यांमध्ये 200 रुपयांपर्यंत मिळते. यामागचं कारण म्हणजे दारूवर लागणारा उत्पादन शुल्क (Excise Duty) प्रत्येक राज्यात वेगळा असतो. दारूवर लागणारा हा कर राज्य सरकार स्वतः ठरवते, कारण दारूला GST (वस्तू व सेवा कर) च्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात दारूच्या किंमतीत फरक पडतो. भारतात कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त दारू मिळते आणि त्या राज्यात दारूचे दर इतके कमी का आहेत? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
राज्यांमध्ये दारूचे दर वेगवेगळे असण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्या राज्यांनी स्वतः ठरवलेली उत्पादन शुल्क (Excise Duty) रक्कम. उत्पादन शुल्क म्हणजे राज्य सरकारकडून दारूसारख्या मादक पदार्थांवर लावला जाणारा कर. प्रत्येक राज्य आपापल्या धोरणानुसार या कराचा दर ठरवते. काही राज्यांमध्ये हा कर खूप जास्त असतो, त्यामुळे तिथे दारू महाग मिळते. तर काही राज्यांनी हा कर कमी ठेवला आहे, जेणेकरून पर्यटक अधिक आकर्षित होतील आणि राज्याच्या उत्पन्नात वाढ होईल.
नक्की वाचा >> सावधान! दादरच्या 'या' ठिकाणी कार पार्क करताय? महाकाय अजगर घुसला कारच्या बोनेटमध्ये..व्हिडीओ पाहून थरकाप उडेल
गोवा सरकारने दारूवर किती लावले उत्पादन शुल्क?
देशात सर्वात स्वस्त दारू गोवा राज्यात मिळते. कारण गोवा सरकारने दारूवर उत्पादन शुल्क (Excise Duty) खूपच कमी ठेवले आहे. गोवा सरकारचं मत आहे की स्वस्त दारूमुळे पर्यटनाला चालना मिळते. त्यामुळे गोवामध्ये बिअर आणि हार्ड लिकर दोन्हीचे दर इतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी आहेत. गोव्यात दारूवर सुमारे 49% कर आकारला जातो, तर अनेक राज्यांमध्ये हा कर 60% ते 70% पर्यंत पोहोचतो. हरियाणामध्येही दारूवर इतर राज्यांच्या तुलनेत कमी कर आकारला जातो. येथे उत्पादन शुल्क (Excise Duty) सुमारे 47% आहे.
दिल्लीमध्ये अनेक राज्यांच्या तुलनेत दारू स्वस्त
हरियाणामध्ये उत्पादन शुल्क कमी असण्यासोबतच कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट (CSD) आउटलेट्सची उपलब्धता असल्यामुळे दारू स्वस्त दरात मिळते. हरियाणामधील गुरुग्राम आणि फरीदाबादसारख्या शहरांमध्ये दारूचे दर शेजारच्या राज्यांपेक्षा कमी आहेत. दिल्ली, सिक्कीम, दमण आणि दीव, तसेच पुडुचेरी हे असे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे दारूचे दर तुलनात्मकदृष्ट्या कमी आहेत. दिल्लीमध्ये दारूवर सुमारे 62% कर आकारला जातो, तर दिल्लीच्या शेजारच्या उत्तर प्रदेशमध्ये हा कर 66% पर्यंत पोहोचतो. तरीही दिल्लीमध्ये अनेक राज्यांच्या तुलनेत दारू स्वस्त मिळते.
नक्की वाचा >> मथुर, बकासूरला घाम फोडला, अख्खा मैदानात हेलिकॉप्टर बैज्यानं उधळला विजयाचा गुलाल, पाहा शर्यतीचा संपूर्ण Video
गोवा आणि पुडुचेरीसारख्या राज्यांच्या सरकारचं मत आहे की स्वस्त दरात दारू उपलब्ध करून दिल्यामुळे पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला चालना मिळते. यामुळे राज्याच्या उत्पन्नात वाढ होते. तर काही राज्यांमध्ये दारूवर जास्त कर आकारला जातो, त्यामुळे तिथे दारूचे दर दुप्पट होतात. याशिवाय, गोवासारख्या राज्यांतून इतर राज्यांमध्ये दारू नेण्यासाठी एक ठराविक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्या मर्यादेनुसार तुम्ही फक्त ठराविक प्रमाणातच दारू बाहेर नेऊ शकता. अन्यथा हे कायदेशीर गुन्हा मानला जातो.