जाहिरात

सावधान! दादरच्या 'या' ठिकाणी कार पार्क करताय? महाकाय अजगर घुसला कारच्या बोनेटमध्ये..व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

Big Python Viral Video : मुंबई शहरातील रस्त्यांवर कार पार्क करण्यासाठी जागा मिळणे, म्हणजे एकप्रकारे नशिबाणं साथ देण्यासारखचं असतं. पण अजगरासारखा साप कारच्या बोनेटमध्ये शिरल्यावर काय घडलं? पाहा व्हिडीओ

सावधान! दादरच्या 'या' ठिकाणी कार पार्क करताय? महाकाय अजगर घुसला कारच्या बोनेटमध्ये..व्हिडीओ पाहून थरकाप उडेल
Python viral video
मुंबई:

Big Python Viral Video : मुंबई शहरातील रस्त्यांवर कार पार्क करण्यासाठी जागा मिळणे, म्हणजे एकप्रकारे नशिबाणं साथ देण्यासारखचं असतं. कारण प्रवाशांनी आणि वाहनांनी भरगच्च भरलेल्या मुंबईत अनेकांचा श्वास कोंडतो. अशातच मुंबईतील दादरमध्ये पार्किंगची जागा शोधण्यात अनेकांना तारेवरची कसरतच करावी लागते. कारण वेळेवर कार पार्क न केल्यानं वाहतूक कोंडीच्या समस्येलाही सामोरं जावं लागतं.

त्यामुळे अनेक लोक घाईगडबडीत एखाद्या झाडाखाली किंवा रस्त्याच्या कडेला कार पार्क करून जातात. पण या रस्त्यावर किंवा झाडावर साप असण्याची दाट शक्यता असते. कारण दादरच्या खेडगल्लीत पार्क केलेल्या एका कारच्या बोनेटमध्ये मोठा अजगर अडकल्याची घटना समोर आलीय. सर्पमित्रांनी वेळीच या अजगराला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, कारमध्ये अडकलेल्या अजगराचा भयानक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबईत वाहतूक कोंडीच्या समस्येमुळं चालक हैराण

मार्गसंख्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर रोडींग मागे पडणे, भौगोलिक मर्यादा, अतिक्रमण, बांधकाम अडथळे, सार्वजनिक वाहतूक पोहोच न होणे, आणि वाहनांची वाढ ही मुंबईतील ट्रॅफिक कोंडीमागील मुख्य कारणं आहेत. परिणामी प्रवासी वेळ, इंधन वाचवा खर्च, आणि आरोग्य प्रभावित होत आहे. मुंबईत 46 लाखांहून अधिक नोंदणीकृत वाहनं असून 2023 मध्ये मध्येच 2.54 लाख नवीन वाहनं भरली गेली, ज्यामुळे वाहतुकीचा दबाव वाढला आहे.

नक्की वाचा >> मथुर, बकासूरला घाम फोडला, अख्खा मैदानात हेलिकॉप्टर बैज्यानं उधळला विजयाचा गुलाल, पाहा शर्यतीचा संपूर्ण Video

शहरात कार पार्क करताना कोणती काळजी घ्यावी ?

योग्य पार्किंग जागा निवडा

  • अधिकृत पार्किंग लॉट, मल्टी-लेव्हल पार्किंग किंवा BMC मान्यताप्राप्त जागा वापरा.
  • "No Parking" चिन्ह असलेल्या जागांपासून दूर रहा.
  • रस्त्याच्या वळणावर, बस स्टॉप, हॉस्पिटल गेट, फायर स्टेशनजवळ पार्किंग टाळा.

वाहन व्यवस्थित लावणे

  • वाहन रेषेच्या आत लावा.
  • इतर वाहनांना बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा ठेवा.
  • वाहन रस्त्यावर अडथळा निर्माण करत असेल तर ते हटवा.

नक्की वाचा >> Jugaad Video: मोटरशिवाय बोअरवेलमधून पाणी काढलं, महिलेचा देशी जुगाड पाहून लोक म्हणाले, बाई..तूच खरी इंजिनिअर..

इथे पाहा अजगराचा व्हायरल व्हिडीओ 

सुरक्षा उपाय कोणते?

  • वाहन लॉक करा आणि खिडक्या बंद ठेवा.
  • महत्त्वाच्या वस्तू (लॅपटॉप, बॅग, मोबाईल) उघड्या जागी ठेवू नका.
  • रात्रीच्या वेळी प्रकाशयुक्त आणि CCTV असलेल्या जागी पार्क करा.

चुकीच्या पार्किंगचे परिणाम

  • ट्रॅफिक पोलिसांकडून वाहन टो केली जाऊ शकते.
  • दंड आकारला जातो.
  • सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
  • अपघात किंवा वाहनाचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com