Maoists : माओवाद्यांकडून पुन्हा शांततेचा प्रस्ताव, खरीखुरी तळमळ की नवी रणनीती?

भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या उत्तर पश्चिम सब झोनल ब्यूरोकडून नुकतंच एक सार्वजनिक वक्तव्य जारी केलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhattisgarh News : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात पुन्हा एकदा शांततेची आशा व्यक्त केली जात आहे. भारताच्या कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) उत्तर-पश्चिम सब झोनल ब्युरोने एक वक्तव्य जारी करीत राज्य सरकारला शांतता वार्तासाठी प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार, बस्तरमध्ये हिंसा रोखण्यासाठी गंभीर आहोत. मात्र यापूर्वी सरकारला वार्ता करण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण करावी लागेल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या उत्तर पश्चिम सब झोनल ब्यूरोकडून नुकतंच एक सार्वजनिक वक्तव्य जारी केलं आहे. याआधी छत्तीसगमधून त्यांच्या केंद्रीय कमिटीचं एक वक्तव्य प्रसारित करण्यात आलं होतं. दोन्हीमध्ये शांतता वार्ताचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामागे खरोखर शांतता प्रस्थापित करण्याची प्रामाणिक भूमिका आहे की, एखादी छुपी रणनीती आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Shirdi News : भिकारी नसताना उचललं, रुग्णालयातच 4 जणांच्या मृत्यूने शिर्डी प्रशासन वादाच्या भोवऱ्यात

यापूर्वी तेलगू भाषेत जारी केलं होतं वक्तव्य...


यापूर्वी केंद्रीय समितीने तेलगू भाषेत वक्तव्य जारी करीत अशाच प्रकारे विनंती केली होती. आता त्याचा विस्तार करीत हिंदीत नवं वक्तव्य जारी करण्यात आलं आहे. माओवाद्यांचं म्हणणं आहे की, गृहमंत्री विजय शर्मा यांनी पहिल्यांदा दिलेला प्रस्ताव नाकारला होता. यावरुन सरकार अजूनही कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी बुद्धिजीवी, मानवाधिकार संघटना, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या उपक्रमात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

Advertisement

तळमळ की नवी रणनीती?

नक्षलवादी नेत्यांना पलायन करावं लागत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या पुढाकारांमुळे नक्षलवादी चळवळींवर नियंत्रण आणता आल्याची माहिती आहे. माओवादी चळवळ वाचवायची असेल तर नेतृत्वाला सुरक्षित करणं आवश्यक आहे. सध्या माओवादी चळवळींविरोधात केंद्राकडून कडक भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे सध्याची कठीण परिस्थिती निभावून नेण्यासाठी ही वेळ सांभाळण्याची गरज व्यक्त करीत माओवाद्यांकडून हा शांततेचा प्रस्ताव पुढे करण्यात आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अधिक संघटित होणं आणि आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी त्यांना काही अवधी लागू शकतो त्यामुळे सद्यस्थितीत ही शांततेची ऑफर दिल्याचं सांगितलं जातं.  

Communist Party of India, Maoists, Chhattisgarh Naxal-affected, Maoists offer peace