3 days ago

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून 19 फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. 

Feb 18, 2025 22:16 (IST)

Live Updates: शिवजयंतीनिमित्त जय शिवाजी, जय भारत पदयात्रेचे आयोजन

बुधवारी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त सकाळी 7.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पदयात्रा कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. ‘जय छत्रपती शिवाजी महाराज, जय भारत पदयात्रा’चे आयोजन सकाळी 8 वाजता महाराष्ट्राच्या 36 पैकी प्रत्येक  जिल्ह्याच्या ठिकाणी करण्याचे केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार ठरले आहे. 

केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजनात भागीदार म्हणून यात सहभाग नोंदविला जाईल. सूत्रांनुसार, स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात स्थानिय स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात प्रत्येक मोठ्या शहरात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी प्रथमच शिव जयंती निमित्ताने केंद्रीय सरकारच्या पुढाकाराने असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याद्वारे स्थानीय स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनाचा पदयात्रे मध्ये प्रत्यक्ष सहभाग असेल. याशिवाय, एम वाय भारत द्वारे नोंदणी केलेले युवा स्वयंसेवक यात सहभागी होतील. आयोजनाची संकल्पना स्वतः पंतप्रधान मोदी यांची आहे.

महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातील 36 पैकी प्रत्येक जिल्ह्यात ही आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री, महानगर पालिका आयुक्त किंवा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी आणि अधिकारी, कर्मचारी वर्गाला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

मुख्य कार्यक्रम पुणे येथे होणार असून तिथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया सहभागी होतील.

Feb 18, 2025 20:29 (IST)

Live Updates: उद्धव ठाकरेंना धक्का! जितेंद्र जानावळे यांचा शिंदेगटात प्रवेश

मुंबईमध्ये वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी पक्षाला रामराम ठोकत उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाला रामराम ठोकल्यानंतर आज त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 

Feb 18, 2025 19:37 (IST)

Nagpur News: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

 2014 वर्षांपूर्वीच्या सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव अनेक वॉरंट निघूनही न्यायालयात हजर होत नव्हते. त्यामुळे न्यायालयाचे निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आला होता. सोमवारी हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळी त्यांनी छातीत दुखत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.  वैद्यकीय तपासणीनंतर प्रकृती स्थिर असल्याच्या वैद्यकीय अहवाल आल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली

Feb 18, 2025 19:36 (IST)

Manoj Jarange Patil: प्रत्येक गावातून एक सेवक... मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक गावातून एक मराठा सेवक निवडायचे आवाहन मराठा समाज बांधवांना हिंगोलीच्या आजेगाव येथे केले आहे.गोरगरीब मराठ्यांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक गावातून एक मराठा सेवक तयार करा. येत्या 22 फेब्रुवारी ते 22 मार्च पर्यंत अंतरवालीत यायचं आहे, प्रत्येक गावातून एका मराठा सेवकाची निवड करायची आहे अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव येथे बोलताना केली आहे....

Advertisement
Feb 18, 2025 19:27 (IST)

Dapoli News: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! 5 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

दापोलीमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार पडलं असून, दापोली नगरपंचायतीमधील 5 नगरसेवकांनी उबाठाला जय महाराष्ट्र करत राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  विलास शिगवण, अन्वर रखांंगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके, अश्विनी लांजेकर या नगरसेवकांनी प्रवेश केला.. या पाच जणांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या आता आठ झाली आहे, त्यामुळे दापोली नगर पंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Feb 18, 2025 19:16 (IST)

Jalgaon News: जळगावमध्ये 3 वर्षीय बालकाला जीबीएसची लागण

जळगाव मध्ये एका तीन वर्षीय बालकाला जीबीएसची लागण झाली असून या बालकावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पाय दुखीचा त्रास असल्यामुळे बालकावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र या बालकाची जीबीएस तपासणी केली असता बालकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात या बालकावर उपचार केले जात असल्याची माहिती वैद्यकीय प्रशासनाने दिली आहे दरम्यान बालकाची प्रकृती ही स्थिर असल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे

Advertisement
Feb 18, 2025 19:15 (IST)

Navi Mumbai News: नवी मुंबईत शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी

उद्या साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. यानिमित्ताने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक भगवामय झाला आहे. नवी मुंबईतील नागरिक आणि प्रशासनाच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख आकर्षणे:

 शिवप्रेमींकडून बाळ शिवबांचा पाळणा आणि शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच शिवकालीन इतिहासावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

 

शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबईत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांना भगवे ध्वज आणि तोरणे लावून सजावट करण्यात आली आहे.

Feb 18, 2025 19:00 (IST)

Pune Crime: पुण्यात हातात बंदूक घेऊन चाळीमध्ये राडा घालण्याचा प्रयत्न

पुण्यात हातात बंदूक घेऊन चाळीमध्ये राडा घालण्याचा प्रयत्न 

पुण्यातील कोथरूड भागातील घटना 

दहशत वाजवण्यासाठी तरुणांकडून हातात पिस्टल घेऊन राडा 

३ ते  ४ आरोपी हातात पिस्टल घेऊन फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हायरल

लोकांच्या घराबाहेर जात आरोपींकडून शिवीगाळ 

स्थानिकांडकून कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार

पुणे पोलिसांकडून घटनेचा आणि आरोपीचा शोध सुरु

Advertisement
Feb 18, 2025 17:58 (IST)

Bhiwandi Fire News: भिवंडीत कॉम्प्लेक्सला भीषण आग

भिवंडी शहरातील गुरुदेव कॉम्प्लेक्स प्लाझा येथील डान्स क्लास ठक्कर कॉम्प्लेक्स ला भीषण आग 

कॉम्प्लेक्स मध्ये अनेक व्यावसायिक गेले व शालेय शिकवणुकीचे कलासेस 

30 ते 35 मुलानं बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांनी काढले बाहेर 

एअर कंडिशन चा शॉर्ट सर्किट मुले आग लागल्याची घटना 

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर आणले नियंत्रण

Feb 18, 2025 17:41 (IST)

Live Updates: आक्षेपार्ह मजकूर हटवा...' महाराष्ट्र सायबरची विकीपीडियाला नोटीस

- महाराष्ट्र सायबरची विकिमिडीया फाऊंडेशनला नोटीस

- पत्रातून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची केली विनंती

- आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या 79(3)(ब) आणि बीएनएस कलम 168 अन्वये बजावली नोटीस

- सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर आयजी यशस्वी यादव यांना बोलावून कठोर कारवाई करण्याचे दिले होते निर्देश

Feb 18, 2025 17:10 (IST)

Sangli News: रोहित पाटील यांच्या विनंतीनंतर चंद्रहार पाटलांचे उपोषण मागे

कुस्ती क्षेत्रातल्या विविध मागण्यांसाठी सांगलीत सुरू असलेला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे उपोषण स्थगित झाले आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित आर आर पाटील आणि कुस्तीगीर महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप बोंडवे यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटील यांनी आपला उपोषण स्थगित केला आहे.रोहित पाटील यांच्या हस्ते सरबत पिऊन पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे.दरम्यान 5 मार्च पर्यंत आपल्या सरकारला आपला अल्टीमेटम असून त्यानंतर आपण बेमुदत आमरण उपोषण करणार,असं देखील पैलवान चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Feb 18, 2025 17:00 (IST)

Live Updates: सुरेश धस यांनी घेतली पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची  आज भेट घेतली.  संतोष देशमुख खून प्रकरणात जीएसटी नेमण्यात आली आहे त्या एसआयटीमध्ये दोन सायबर सेलच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे.  तसेच काही आरोपींनी दहा तारखेच्या नंतर आपले मोबाईल बंद करून ते गोदावरी नदीमध्ये फेकलेत त्यामुळे अडचणी येत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला विलंब लागला आहे आणि त्यांच्या विलंबाला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी. 

Feb 18, 2025 16:58 (IST)

Pune Crime: पत्नीवर अश्लील कमेंट केल्याने मित्राचा खून, पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यात पत्नीवर अश्लील कमेंट केल्याने मित्राकडूनच मित्राचा खून 

पुण्यातील कात्रज भागातील घटना 

पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मद्यप्राशन करत बसलेल्या मित्रांमध्ये राडा 

घटस्फोटीत बायकोवर अश्लील आणि खालच्या भाषेत कमेंट केल्याने लोखंडी रॉडने वार करत आरोपीकडून मित्राचा खून 

नयन प्रसाद अस मृत तरुणाच नाव 

खून करून आरोपी पश्चिम बंगालला झाला होता फरार 

भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपीला पश्चिम बंगाल मधून अटक 

बिरान सुबल कर्माकर असं अटक केलेल्या आरोपीचे नाव 

मोबाईलच तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी परराज्यात जाऊन आरोपीला ठोकल्या बेड्या 

Feb 18, 2025 16:47 (IST)

Pune News: GBSच्या प्रादुर्भावाचे मुख्य कारण समोर, पोल्ट्री चालकांना दिलासा

पुण्यात 'Guillain-Barré Syndrome' (GBS) या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली असून, याचे मुख्य कारण दूषित पाणी असल्याचे समोर आले आहे. 

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत कोंबडीच्या मांसामध्ये कोणतेही हानिकारक जीवाणू आढळले नाहीत, त्यामुळे या आजाराचा संबंध दूषित पाण्याशी असल्याचे स्पष्ट झाले आहे

182 रुग्णांना GBS ची लागण

जानेवारीपासून आतापर्यंत 210 संशयित रुग्ण आढळले आहेत, ज्यापैकी 182 जणांना GBS ची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. 

Feb 18, 2025 16:40 (IST)

Shiv Jayanti 2025: शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

19 फेब्रुवारी रोजी राज्यभरात मोठ्या थाटामाटात शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातही पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह मोडवर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या खामगाव शहरातून आज पोलिसांनी मिरवणूक मार्गावरून रूट मार्च काढून मिरवणूक मार्गाचा आढावा घेतला आहे. ठिकठिकाणी पोलीस चेक पोस्ट आणि सीसीटीव्ही च्या माध्यमातून या मिरवणुकीवर पोलीस लक्ष ठेवणार आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून बुलढाणा जिल्ह्यात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच दंगा काबू योजना सुद्धा खामगाव शहरात राबविण्यात आली आहे.

Feb 18, 2025 16:40 (IST)

Chandrahar Patil protest: चंद्रहार पाटील यांच्या उपोषणस्थळी रोहित पाटील यांची भेट

चंद्रहार पाटील यांचे उपोषण स्थळी रोहित आर आर पाटील यांनी दिली भेट. 

रोहित आर आर पाटील यांच्या मध्यस्थी ने उपोषण घेतले माघे. 

माझा आक्षेप या सिस्टिमवर आहे. चार चार महाराष्ट्र केसरी असू नयेत. 

माझ्या लहान मुलं सोबत मी आज उपोषण ला सकाळ पासून बसलो आहे. 

30 तारखे पर्यंत वाट बघणार नाहीतर 5 तारखेला मंत्रालय पुढे महाराष्ट्र केसरी ना घेऊन आमरण उपोषणला बसणार. माझ्या गदा सरकारला देणार. 

लवकर तोडगा निघाला ही विनंती

Feb 18, 2025 16:18 (IST)

Live Updates: जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का! खंदा समर्थक करणार अजित पवार गटात प्रवेश

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महापालिका  निवडणुकी पूर्वीच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून मोठा धक्का..

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अभिजीत पवार यांची राष्ट्रवादीसोबत जितेंद्र आवड यांना सोडचिठ्ठी...

लवकरच जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अभिजीत पवार राष्ट्रवादी अजित पवार गटात करणार पक्षप्रवेश..

अभिजीत पवार यांच्या समवेत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अगदी जवळचे कार्यकर्ते देखील पक्षप्रवेश राष्ट्रवादी अजित पवार पक्षात करण्याची शक्यता..

आज सायंकाळी साडेचार ते पाच दरम्यान मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती..

Feb 18, 2025 16:14 (IST)

Nashik News: महायुतीमधील अंतर्गत वाद विकोपाला, शिंदेंसेनेच्या कार्यकर्त्याला अटक

 नाशिकमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद विकोपाला

अजित पवारांना पेट्रोल टाकून जाळा अशी पोस्ट व्हायरल करणाऱ्या शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला अटक.

- दोन दिवसांपूर्वी अजित पवार भगूर येथे विकास कामाच्या भूमिपूजनासाठी आले असता सोशल मीडियावर करण्यात आला होता मेसेज व्हायरल 

- राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदार सरोज अहिरे आणि शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्यातील संघर्ष विकोपाला 

- अजित पवारांना पेट्रोल टाकून जाळा असा मेसेज व्हायरल करणाऱ्या संशयित कार्यकर्त्याला पोलिसांकडून अटक 

- नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Feb 18, 2025 15:37 (IST)

Mira Road Crime: धक्कादायक! इमारतीत प्रवेश दिला नाही म्हणून गाडी अंगावर घातली

मिरा रोड मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर 

इमारती मध्ये प्रवेश दिला नाही म्हणून गाडी घातली अंगावर 

इमारतीच्या सुरक्षा रक्षक आणि इतर चार जणांच्या अंगावर गाडी घातली 

मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारसची घटना 

कशिश गुप्ता असे वाहन चालकचे नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे 

जेपी नॉर्थ उच्चभ्रू संकुलातील बार्सिलोना या इमारतीच्या प्रवेश द्वार जवळ घडली घटना 

चालकाने मद्यपान केल्याची प्राथमिक माहिती 

काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून अद्याप ही कोणाला अटक नाही अशी माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक महेश तोगरवाड यांनी दिली

Feb 18, 2025 15:25 (IST)

Live Updates: डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंची रणनिती! लवकरच कोकण दौरा

ठाकरेंच्या शिवसेनेचं कोकणात झालेल्या डॅमेज नंतर उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार

कोकणात नवीन लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करा उद्धव ठाकरे यांच्या सूचना

 वैभव नाईक यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची काल भेट, निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना वैभव नाईक भेटले

एसीबी चौकशीची लढाई एकटा लढणार, या लढाईसाठी कुठल्याही पक्षात जाणार नाही  - वैभव नाईक

माझ्यावर कुठलाही दबाव नाही, माझी भूमिका स्पष्ट मी उद्धव ठाकरे सोबत राहणार - वैभव नाईक

Feb 18, 2025 15:24 (IST)

Live Updates: फडणवीसांकडून अजेंडा लिक करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा

बैठकीपूर्वीच लिख होणाऱ्या कॅबिनेट अजेंडाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला तीव्र संताप.

आपण मंत्री असताना गोपनीयतेची शपथ घेतो मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा देखील गोपनीय असतो त्यामुळे बैठकीपूर्वी तो सार्वजनिक करू नये असं मी मंत्र्यांना देखील सांगितलं. 

आणि मी अधिकाऱ्यांना देखील सांगतोय की जे अधिकारी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अजेंडा लीग करत असेल त्यांच्यावर मी कारवाई करेल.

Feb 18, 2025 13:48 (IST)

Live Update : वसईत महसूल विभागाचे भरारी पथक ACB च्या जाळ्यात

वसईत पालघर महसूल विभागाचे भरारी पथक ACB च्या जाळ्यात अडकले आहे. महसूल विभागाचे भरारी पथकातील दोन पोलीस कर्मचारी आणि एक खासगी इसमाला ACB ने घेतले ताब्यात घेतले असून, भरारी पथकाचे प्रमुख शुल्क निरीक्षक मारोती सूर्यवंशी आणि इतर साथीदार फरार आहेत. महसूल खडी वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 50 हजार घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाट कारवाई केली आहे.

Feb 18, 2025 13:47 (IST)

Live Update : शिक्षक आमदार सुधाकर अडबाले धावले प्रकल्पग्रस्तांच्या मदतीला, खाजगी कंपनीचे काम पाडले बंद

निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाकरीता संपादित करण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील दहा गावातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रशासनासोबत चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पोलीस बंदोबस्ताचा वापर करुन खाजगी कंपनीने काम सुरू केले होते. प्रकल्पग्रस्तांमार्फत विरोध होऊ नये, यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने प्रमुख चार प्रकल्पग्रस्तांना स्थानबद्ध करून ठेवले होते. या घटनेची माहिती शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना मिळाली असता त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठून स्थानबद्ध केलेल्या प्रकल्पग्रस्तांना बाहेर काढले व घटनास्थळी जावून कंपनीचे काम बंद पाडले. 

या घटनेतून प्रशासनाचे दुटप्पी धोरण प्रकल्पग्रस्तांच्या नजरेस आले. परिणामी प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष निर्माण झाला असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जिल्हा व तालुका महसूल तथा पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. सोबतच पुन्हा कंपनीचे काम सुरु झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

Feb 18, 2025 10:43 (IST)

Live Update : कृष्णा आंधळे आणि सर्व आरोपींचे सीडीआर काढायला हवेत - सुप्रिया सुळे

कृष्णा आंधळे आणि सर्व आरोपींचे सीडीआर काढायला हवेत - सुप्रिया सुळे

Feb 18, 2025 09:24 (IST)

Live Update : हिंगोली जिल्ह्यातील सिंचन तलावाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट..

फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील 27 मोठे व लघु सिंचन तलावाच्या पाणी पातळीत कमालीची घट होताना पाहायला मिळत आहे.  जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला होता आणि त्यामुळे सर्वच सिंचन तलाव, धरणे तुडुंब भरली होती. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तलावाच्या पाणी पातळीत घट होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे, दरम्यान जलसंपदा विभागाने वेळीच पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे अन्यथा उन्हाळ्यामध्ये अनेक गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो

Feb 18, 2025 09:20 (IST)

Live Update : खासदार सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये दाखल, देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट

खासदार सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये दाखल, देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट

Feb 18, 2025 09:00 (IST)

Live Update : महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या, चंद्रहार पाटलांची मागणी

विविध महाराष्ट्र केसरी स्पर्धा हा महाराष्ट्र केसरीचा अपमान असून महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी, या मागणीसाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रहार पाटील लाक्षणिक उपोषण सुरू करणार आहेत. तसेच वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे महाराष्ट्रात देखील कुस्ती संघटनेचाही एक संघटना असली पाहिजे. एकच महाराष्ट्र केसरी असला पाहिजे आणि त्यासाठी एक कोटी बक्षीस जाहीर करणाऱ्यांनीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी अशा विविध मागण्यासाठी आजपासून उपोषण करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Feb 18, 2025 08:56 (IST)

Live Update : नाशिकमध्ये साकारली सिंहासनावर बसलेली 45 फूट शिव छत्रपती शिवरायांची मूर्ती..

नाशिकमध्ये साकारली सिंहासनावर बसलेली 45 फूट शिव छत्रपती शिवरायांची मूर्ती..

नाशिकच्या अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी शिवरायांचे विविध देखावे सादर केले जातात. यावर्षी देखील मंडळाने भव्य अशी तब्बल 45 फूट अशी मूर्ती साकारली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उद्या शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. नाशिकमध्ये देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असते. अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळातर्फे मागील वर्षी 65 फुटी तर त्या मागील वर्षी 62 फुटी  शिवरायांची मूर्ती साकारली होती