मुंबई आणि गोवा बार असोसिएशनच्या वतीने देशाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभ आयोजन करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. लोकांचा प्रतिसाद पाहून भाषणादरम्यान अमरावतीचे सुपूत्र भूषण गवई भावुक झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी भूषण गवई म्हणाले, या 14 मेला मी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यादिवशी महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने जे प्रेम दिलं, त्याने मी भारावून गेलो आहे. शपथविधीसाठी इतक्या मोठ्या संख्येने वकिलवर्ग दिल्लीला उपस्थित होता. सरन्यायाधीशपदाच्या शपथेसाठी इतक्या मोठ्या संख्येने वकील वर्ग दिल्लीत उपस्थित राहिले असं इतिहासात पहिल्यांदाच झालं असेल. त्यादिवशी कोणाची गैरसोय झाली असेल तर माफी मागतो, असंही ते म्हणाले.
मला वकील व्हायचं नव्हतं...
सुरुवातील माझी वकील होण्याची इच्छा नव्हती. मला आर्किटेक होण्याची इच्छा होती. मात्र वडिलांना त्यांच्या लहानपणी वकील व्हायचं होतं. मात्र एलएलबीच्या परीक्षेदरम्यान बाबा सत्याग्रहात अटक झाल्यामुळे ते तुरुंगात होते. त्यांची इच्छा मी पूर्ण करावी अशी त्यांचं म्हणणं होतं. त्यांचा आदेश मी मान्य केला आणि एलएलबीला प्रवेश घेतला. केसी महाविद्यालयात पदवी आणि सरकारी लॉ कॉलेजमध्ये एलएलबीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर आम्ही पुन्हा अमरावतीला शिफ्ट झालो. त्यावेळी पंजाबराव लॉ कॉलेजमध्ये विधीचं पुढील शिक्षण घेतलं.
नक्की वाचा - Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मोठा हात..
अनेकांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रवासाची सुरुवात अमरावतीतून झाली. नगरपरिषद शाळा क्रमांक 8 येथून माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली. आज मी जो काही आहे, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जितका सहभाग तितकाच माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्काराचा हात आहे. आई-वडिलांकडून मी कष्ट शिकलो. त्या काळी आमची बेताची परिस्थिती होती. वडील आंबेडकर चळवळीत सहभागी होते. त्यामुळे घराची जबाबदारी आईवर होती. त्यात एकत्रित परिवार होता. वडिलांचे अनेक नातेवाईक एकत्र राहत होते. माझी आई आणि वडिलांची सर्वात लहान बहीण, माझी आत्या सर्व जबाबदारी पेलवत होत्या. या सर्वांना पाहून मला जगण्याची प्रेरणा घरातून मिळाली. माझ्या जडणघडतीत सर्वात मोठं योगदान माझ्या वडिलांचं. समाजासोबत राहण्याची, वावरण्याची सवय लहानपणापासून त्यांच्यामुळे मिळाली. समाजाचे तळागाळातील लोकांचं प्रश्न समजून घेता आले. मी आंबेडकर चळवळीत लहानपणापासून सामील होतो. त्यामुळे आंबेडकरांनी निर्मित केलेली राज्यघटना, माझ्या आयुष्याचा पाया बनलं.