मुंबईत घर, 12 कोटी पोटगी आणि BMW कार; पत्नीच्या मागण्या ऐकून सगळेच अवाक

12 Crore Alimony Demand: तू स्वत: काम का नाही करत? असा सवाल या महिलेला विचारण्यात आला

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

सर्वोच्च न्यायलयासमोर मंगळवारी कौटुंबिक कलहाचे एक प्रकरण सुनावणीसाठी आले होते. यावर सुनावणी करताना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पत्नीला विचारले की तुझ्या मागण्या काय आहेत? यावर त्या महिलेने मागण्यांची एक यादीच मांडली, ज्यामध्ये मुंबईत एक घर BMW कार आणि 12 कोटींच्या पोटगीचा समावेश होता. ही मागणी ऐकून न्यायालयही अवाक झाले होते. सरन्यायाधीशांनी या महिलेच्या मागण्या ऐकल्यानंतर तिला म्हटले की तू चांगली शिकलेली आहेस आणि तू स्वत:ही कमावू शकतेस. 

( नक्की वाचा: मुंबईतील शिक्षिकेवर बलात्काराचा आरोप, विद्यार्थी'प्रेमी' महिलेला जामीन मंजूर )

कमा के खाना चाहीये!

सरन्यायाधीशांनी या महिलेने केलेल्या मागणीवर सवाल केला की ज्या घराची मागणी करते आहेस ते घर 'कल्पतरू'मध्ये आहे, ती इमारत नामवंत बिल्डरने उभारलेली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई पुढे म्हणाले की, "तुझ्यासारख्या उच्चशिक्षितांना बंगळुरू, हैदराबादमध्ये चांगली संधी आहे. तू एमबीए केलं आहे, तू स्वत: काम का नाही करत?" सरन्यायाधीश गवई पुढे म्हणाले की तुझ्या लग्नाला अवघे 18 महिने झालेत आणि तुला BMW कार हवी आहे ? इतकंच नाही तर तू 18 महिन्यांच्या लग्नामध्ये दर महिन्याच्या हिशोबाने दर महिना 1 कोटींची मागणीही करते आहेस. 

( नक्की वाचा: घटत्या लोकसंख्येवर अजब उपाय! 'या' देशात विद्यार्थिनींना गर्भवती झाल्यावर मिळणार 1 लाख रुपये )

मी स्किझोफ्रेनिक वाटते का ?

सरन्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना या महिलेने म्हटले की माझा नवरा श्रीमंत आहे आणि मी स्किझोफ्रेनिक असल्याचे म्हणत त्यानेच हे लग्न मोडावे यासाठी अर्ज केला आहे. सदर प्रकरणात पतीच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकील माधवी दिवाण यांनी म्हटले की ही महिला देखील काम करू शकते आणि असा पद्धतीने सगळ्या गोष्टींची तिने मागणी करणे हे अवाजवी आहे. या महिलेने न्यायालयात म्हटले की मी तुम्हाला स्किझोफ्रेनिक वाटते का ? यावर सरन्यायाधीशांनी या महिलेला म्हटले की तू नवऱ्याच्या वडिलांनी कमावलेल्या संपत्तीवर अधिकार सांगू शकत नाही. या महिलेने न्यायालयाला सांगितले की तिचा नवरा सिटी बँकेत व्यवस्थापक असून त्याचेदोन बिझनेसही आहेत. आपल्याला मूल जन्माला घालण्याची इच्छा होती, मात्र नवऱ्याने मी स्किझोफ्रेनिक असल्याचे म्हणत वेगळे होण्यासाठी याचिका केली असेही तिने म्हटलंय.  

नोकरी शोधण्याचा सल्ला

न्यायालयाने नवऱ्याचे IT रिटर्न्सही तपासले कारण नवऱ्याच्या वकिलांनी म्हटले होते की नोकरी गेल्यानंतर त्याचे उत्पन्न घटले आहे. यानंतर न्यायालयाने महिलेला सांगितले की जो फ्लॅट तुला दिला जात आहे त्यावर समाधान मानून तू स्वत: कमावणे सुरू कर, किंवा 4 कोटी घेऊन स्वत:साठी पुणे, हैदराबाद किंवा बंगळुरूमध्ये नोकरी शोध. 

Advertisement
Topics mentioned in this article