4 days ago

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत सत्ता संपादन केली. दरम्यान आज नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निश्चिती होणार असल्याची शक्यता आहे. 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीचे नवे मुख्यमंत्री शपथ घेतील अशी माहिती आहे. 

Feb 17, 2025 21:58 (IST)

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेला स्थगित करण्याचे काँग्रेस आवाहन

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेला स्थगित करण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे. 2 मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकाल दिला होता की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश यांचे पॅनल असावे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऑगस्ट 2023 मध्ये केंद्र शासनाने कायदा पारित केला. ज्यानुसार निवड पॅनलमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सर न्यायाधीश यांचे ऐवजी पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या एका केंद्रीय मंत्र्याची सदस्य पदी नेमणूक करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. हे पाऊल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या भावनेच्या सुसंगत नव्हते, असे काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हणण्यात आले आहे. याविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून केवळ 48 तासाच्या अवधीत म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी हा विषय घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शवली आहे. तोपर्यंत केंद्र सरकारने पुढचा  मुख्य निर्वाचन आयुक्त निवडीची प्रक्रिया टाळावी. जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाला या विषयावर सुनावणी घेऊन निर्णय देता येईल, अशी मागणी केली आहे.

Feb 17, 2025 21:55 (IST)

Dharashiv Accident: धाराशिवमध्ये भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

उमरगा तालुक्यातील माडज पाटी येथे पिकअप व मोटरसायकलचा भिषण अपघात

अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर एकजन जखमी झाल्याची माहिती

मयत दिंगभर कांबळे उमरगा तालुक्यातील येळी तर मोटरसायकल वरील आकाश रामपूरे,दिपक रामपुरे हे दोघे औसा तालुक्यातील मंगरुळ येथील रहीवासी

जखमीला उपचारासाठी उमरगा शासकीय रुग्णालयात करण्यात आले दाखल

Feb 17, 2025 21:46 (IST)

Live Updates: महायुतीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात! गृह विभागाचा मोठा निर्णय

भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावर गृह विभागाचा निर्णय

ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षतेत कपात

भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रतापराव चिखलीकरसह विविध नेत्यांच्या सुरक्षेत कपात

शिवसेनेचे मंत्री वगळता आमदारांना दिलेली सुरक्षाही कमी केली जाणार

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या सर्व आमदारांना दिली गेली होती Y प्लस दर्जाची सुरक्षा 

गरज नसताना सुरक्षेचा लवाजमा घेऊन मिरवणार्यांची सुरक्षा काढून घेतली जाणार

Feb 17, 2025 21:10 (IST)

मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणात झालेल्या गैर व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार

मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणात झालेल्या गैर व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे. मिठी नदीच्या गाळ उपसण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधान परिषदेत भाजप नेते प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांनी केला होता.  त्यानुसार राज्यसरकारने या प्रकरणी SIT स्थापन करून  चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.

Advertisement
Feb 17, 2025 21:08 (IST)

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले

अनेक वर्षांपूर्वीच्या सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव अनेक वॉरंट निघूनही न्यायालयात हजर होत नव्हते. त्याचा स्थानिक वकील देखील हजर राहत नव्हता अशी माहिती आहे. त्यामुळे न्यायालयाचे निर्देशानुसार त्यांच्या विरोधात अजामीनपात्र (नॉन बेलेबल) वॉरंट काढण्यात आले होते.. 

Feb 17, 2025 19:37 (IST)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोल्हापुरात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी  न्यू पॅलेस याठिकाणी खासदार शाहू महाराज यांची  भेट घेतली.  या भेटी दरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.  तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे, आमदार अमल महाडिक देखील उपस्थित होते. 

Advertisement
Feb 17, 2025 19:11 (IST)

Live Updates: कोथरूड येथे 20 फेब्रुवारी पासून संत्रा महोत्सवाला सुरुवात

पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पनेअंतर्गत गांधी भवन, कोथरूड येथे 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ‘संत्रा महोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली आहे. 

 संत्रा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया ही पणन मंडळाच्या अमरावती व नागपूर विभागीय कार्यालयाकडे करण्यात आलेली असुन यावेळी सुमारे 50 संत्रा उत्पादक सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना पुणे येथील गांधी भवन, कोथरूड येथे सुमारे 25 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उत्पादकांमार्फत उत्तम प्रतिचा मृग बहारातील चवीला गोड असणारा अस्सल नागपूरी संत्रा, संत्र्याचा चवदार ताजा रस, संत्रा बर्फी व इतर संत्रा उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीकरीता  सहाय्यक सरव्यवस्थापक मंगेश कदम 7588022201 यांच्याशी संपर्क साधावा, विदर्भातील उच्च प्रतीच्या नागपूरी संत्रा व इतर उत्पादित पदार्थाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.कदम यांनी केले.

Feb 17, 2025 19:08 (IST)

Live Updates: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, 1200 साहित्यिक विशेष एक्सप्रेसने दिल्लीला जाणार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. 

मराठी भाषा विभागाचा निर्णय…

1200 साहित्यिक विशेष एक्सप्रेसने दिल्लीला जाणार.

एक्सप्रेसमध्ये ही रंगणार साहित्य संमेलन.

एक्सप्रसेच्या बोगीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन.

मराठी भाषा विभागाचे विविध कार्यक्रम.

एक्सप्रेसला महापराक्रमी महादजी शिंदे यांचे नाव देणार.

Advertisement
Feb 17, 2025 19:07 (IST)

Virar Accident: विरारमध्ये भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक, पत्नीचा जागीच मृत्यू, पती जखमी

विरार पूर्वेच्या संत नगर परिसरात एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील पत्नी राजश्री तांबे (३६) हीचा जागीच मृत्यू तर पती सचिन तांबे (४०) हा गंभीर जखमी झाला आहे. विरार पोलिसांनी आरोपी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून तो दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे. विरार पूर्वच्या मनवेल पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे ट्रॅव्हल्स चे पार्किंग केले जाते. तसेच नेहमीच बेदरकारपणे चालवल्या जातात आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढलेला आहे. परंतु अनेक वेळा तक्रारी करून देखील या ट्रॅव्हल्स वर पोलीस प्रशासन किंवा आरटीओकडून कारवाई केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Feb 17, 2025 18:21 (IST)

Akola Crime: अकोल्यामध्ये दोन गटात जोरदार राडा, 6 जखमी

अकोला जिल्ह्यातील हातरुन गावात एकाच समुदायातील दोन गटात तुफान हाणामारी झालीये.. आज सोमवारी दुपारी ही घडली आहेय.. पोलिसात आपल्या विरोधात तक्रार दिल्याच्या संशयावरून एका गटातील काही जणांनी दुसऱ्या गटावर हल्ला चढविला.. यानंतर दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली.. यामध्ये एका वाहनाची जाळपोळ देखील करण्यात आलीय..

Feb 17, 2025 18:20 (IST)

Beed News: बीड जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त, माजलगाव न्यायालयाकडून आदेश

बीडच्या माजलगाव जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडी जप्तीचे आदेश दिलेत. या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कार्यालयातून जप्त करण्यात आली आहे. 

वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथे लघु सिंचन तलावासाठी तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या जमिनी संपादित केल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात आलेला मावेजा तुटपुंजा होता. त्यामुळे वाढीव मावेजा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी माजलगाव न्यायालयात धाव घेतली होती. 

Feb 17, 2025 18:19 (IST)

Live Updates: खासदार सुप्रिया सुळे उद्या घेणार देशमुख आणि मुंडे कुटुंबाची भेट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उद्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. सकाळी 9 वाजता सुप्रिया सुळे मस्साजोग गावात हेलिकॉप्टरने दाखल होतील. यादरम्यान देशमुख कुटुंबीयांची सांत्वन घेऊन आत्तापर्यंत झालेल्या तपासाची त्या माहिती देखील घेणार आहेत. 

याबरोबरच परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात माहिती जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांची त्या परळीत भेट घेणार आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या समवेत जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर असणार आहेत. या दोन्ही प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर सुप्रिया सुळे थेट मुंबईला जाणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. 

Feb 17, 2025 18:18 (IST)

Live Updates: तुताऱ्या फुंकून दुष्काळाला पाणी येत नसते, विखे पाटलांची शरद पवारांवर टीका

दुष्काळी भागाला पाणी देणे अव्यवहार्य आहे. असे म्हणणाऱ्या जाणता राजा नेत्याला जनतेने डोक्यावर घेतले.त्यामुळे जाणता राजाला आता कळून चुकले आहे. दुष्काळी भागाला पाणी देता येते. तुताऱ्या फुंकून कधीच दुष्काळाला पाणी देता येत नाही. अशा शब्दात राज्याची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली. 

Feb 17, 2025 17:07 (IST)

Live Updates: उद्यापासून राज्यभरातील आरोग्यमित्र बेमुदत संपावर जाणार

उद्यापासून राज्यभरातील आरोग्यमित्र बेमुदत संपावर जाणार

राज्यातील एकूण 33 जिल्ह्यातील अंदाजे 1500 आरोग्यमित्र जाणार संपावर

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्यमित्र जाणार संपावर

महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेवर संपाचा परिणाम होण्याची शक्यता

किमान वेतन, वार्षिक वेतनवाढ, आरोग्य मित्रांच्या रजासह इतर मागण्यांसाठी संपाची हाक

Feb 17, 2025 16:57 (IST)

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंना आणखी एक धक्का! 5 नगरसेवकांचा पक्षाला रामराम

कोकणात ठाकरेंना आणखी एक धक्का

दापोलीनगर पंचायतीमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार

पाच नगरसेवकांनी केला वेगळा गट स्थापन 

पाचही नगरसेवक करणार उद्या शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून केला होता शिवसेना उबाठात प्रवेश

आता विकासकामांसाठी करताहेत शिवसेनेत प्रवेश

विलास शिगवण, अन्वर रखांंगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके, अश्विनी लांजेकर यांनी केला वेगळा गट स्थापन

आज जिल्हा प्रशासनाला दिलं पत्र.. कागदपत्रांची केली पूर्तता

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या करणार शिवसेनेत प्रवेश

Feb 17, 2025 16:55 (IST)

Vasai News: वसईत बारावीचा डमी विद्यार्थी पकडला, शरद पवार गटाचा नेता ताब्यात

वसईत बारावीचा डमी विद्यार्थी पकडला

वसईतल्या ओम साई इंग्लिश हायस्कूल परीक्षा केंद्रावरील घटना

बारावी विज्ञान च्या फिजिक्स पेपरच्या वेळी डमी विद्यार्थी पकडला

अरबाज असलम कुरेशी या विद्यार्थ्याच्या नावावर बसला होता डमी विद्यार्थी

डमी विद्यार्थी अहमद खान याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

अरबाज असलम कुरेशी हा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा पदाधिकारी

राष्ट्रवादीच्या अंबरनाथ शहर विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष

Feb 17, 2025 16:54 (IST)

Nashik News: सिडकोत भर दिवसा ज्वेलर्स दुकानावर दरोडा, परिसरात खळबळ

नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर या ठिकाणी श्री या ज्वेलर्स या दुकानावर भर दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की श्री ज्वेलर्स या दुकानाचे मालक घोडके व त्यांची पत्नी हे दुकानात बसलेले असताना दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी घोडके यांना बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पसार झाले भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी दरोडा पडल्याने सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस घटना समजतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह संपूर्ण पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली..

Feb 17, 2025 16:14 (IST)

Live Updates: फोडाफोडीचे राजकारण बस करा, जनतेचे प्रश्न सोडवा: ठाकरेंच्या शिलेदाराचा शिंदेंना सल्ला

फोडाफोडीचे राजकारण बस करा, जनतेचे प्रश्न सोडवा; ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटलांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सल्ला 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत सर्वसामान्य शिवसैनिक,कितीही दबाव टाकला तरी शिवसैनिक फुटणार नाही, 

दबाव टाकून पक्ष फोडल्याच्या खासदार संजय देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार कैलास पाटील यांचे मत

सत्तेसाठी तुम्ही फोडाफोडी केली, पुन्हा सत्तेत आलात आता जनतेचे प्रश्न सोडवा-  कैलास पाटील 

शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या बंडावेळी गुजरातच्या वाटेवरून परत येत कैलास पाटील उद्धव ठाकरेसोबत राहिले एकनिष्ठ 

शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चाही कैलास पाटलांनी फेटाळून लावली 

Feb 17, 2025 14:04 (IST)

Live Update : India Got Latent मधील वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी रणवीर अलाहाबादिया आज राष्ट्रीय महिला आयोगासमोर अनुपस्थितीत

India Got Latent मधील वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी रणवीर अलाहाबादिया आज राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर झाला नाही

रणबीर अलहाबदिया यांनी आयोगाला सांगितलं की, त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांनी सुनावणी तीन आठवड्यांनंतर पुढे ढकलण्याची विनंती केली.

एनसीडब्ल्यूने रणबीरला आयोगासमोर हजर राहण्यासाठी 6 मार्चची तारीख दिली आहे.

Feb 17, 2025 12:18 (IST)

Live Update : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जबाब नोंदविण्याची परवानगी नाकारली, समय रैनाला महाराष्ट्र सायबरकडून दिलासा नाही

India's Got Latent प्रकरणात समय रैनाने महाराष्ट्र सायबरने आपला जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दाखल करण्यासाठी विनंती केली होती. समय रैना सध्या देशाच्या बाहेर आहे. त्यामुळे त्याने आपला जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देऊ इच्छित असल्याचं सांगितलं. मात्र महाराष्ट्र सायबरने समय रैनाला कोणतीही सूट देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे समय रैना याला स्वत: येऊन आपला जबाब द्यावा लागेल. उद्या 18 फेब्रुवारी रोजी समय रैना याला महाराष्ट्र सायबरने आपला जबाब नोंदविण्यासाठी बोलावलं आहे.  

Feb 17, 2025 11:34 (IST)

Live Update : उजनी धरणातून पिण्याच्या पाण्याचा विसर्ग प्रवाहित, सोलापूरकरांची तहान भागणार..

सोलापूर शहरासह अक्कलकोट सांगोला मंगळवेढा पंढरपूर आधी परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून आज 1600 क्युसेक्स इतक्या विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच आता नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे सोलापूर शहरासह पंढरपूर परिसरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

Feb 17, 2025 10:49 (IST)

Live Update : नव्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज बैठक

नव्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखालील त्रिसदस्यीय समितीची होणार बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि एक केंद्रीय मंत्री यांची असेल समिती

पंतप्रधानांच्या निवासस्थानी दुपारी 12 वाजता होणार बैठक

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार उद्या निवृत्त होणार असल्याने देशाला मिळणार आहेत नवे आयुक्त

Feb 17, 2025 10:12 (IST)

Live Update : पोलीस उपअधीक्षकाची टीम करणार बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट

बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट आज केले जाणार आहे. पोलीस उपाधीक्षक यांच्या टीम च्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. दुपारी 12 च्या सुमारास उपाधीक्षकाची टीम कारागृहाची पाहणी करेल. आणि याचा  अहवाल पोलीस अधीक्षकांकडे दिला जाणार आहे.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी याच कारागृहात आहेत. यामुळे या ऑडिटला महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान एस आय टी कडून बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्याच अनुषंगाने आज बीड पोलीस उपअधीक्षकांचे पथक हे ऑडिट करणार आहे.

Feb 17, 2025 09:56 (IST)

शेअर बाजारात सलग नवव्या दिवशी घसरण

शेअर बाजारात सलग नवव्या दिवशी घसरण 

बाजार उघडताच सेन्सेक्स जवळपास 450 अंकांनी तर निफ्टी 150 अंकांनी खाली

Feb 17, 2025 09:35 (IST)

Live Update : शेअर बाजारात सलग नवव्या दिवशी घसरण

शेअर बाजारात सलग नवव्या दिवशी घसरण; निफ्टी 22750 जवळ आणि सेन्सेक्स 75 हजार 500 च्या खाली..

Feb 17, 2025 09:08 (IST)

Live Update : कोळशावरील तंदूर भट्ट्या बंद होणार, महापालिकेची 110 हाॅटेल्सना नोटीस

कोळशावरील तंदूर भट्ट्या बंद होणार, महापालिकेची 110हाॅटेल्सना नोटीस

इलेक्ट्रिक एलपीजी, सीएनजी , पीएनजीचा वापर करणे अनिवार्य

८ जुलैपर्यंत कोळसा भट्टी बंद करण्याचे आदेश, अन्यथा कठोर कारवाई 

मुंबईत होत असलेले वायु प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेची पावले

Feb 17, 2025 09:03 (IST)

Live Update : दिवंगत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांचे रात्री दहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. निलंगा येथील शिंदखेड रोडवर असणाऱ्या त्यांच्या शेतात 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या त्या पत्नी होत्या. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या त्या आई आहेत. तर माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आजी आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रदीर्घ राजकारणात त्यांनी कायमच खंबीर साथ दिली आहे. मतदार संघातील प्रत्येक गावातील अनेक लोकांशी त्यांचा व्यापक संपर्क होता.

Feb 17, 2025 08:11 (IST)

Live Update : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा अपघात, एकाचा मृत्यू तर 15 ते 20 प्रवासी जखमी

वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा अपघात

 

वनोजा ते मालेगावच्या दरम्यान झाला अपघात.

राजलक्ष्मी कंपनीची साईरथ नावाची खाजगी बसने पुण्यावरून नागपूरकडे जात असताना हा अपघात घडला

या अपघातात एकाचा मृत्यू तर 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

बसमध्ये एकूण 30 ते 35 प्रवासी होते.

वाशिमचे आमदार श्याम खोडे आणि शेलूबाजार येथील युवक मदतीसाठी अपघातस्थळी दाखल

रुग्ण वाहिकेतून जखमी प्रवाशांना कारंजा आणि अकोला येथे उपचारासाठी पाठवले.

Feb 17, 2025 07:24 (IST)

Live Update : धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर घराची मंजुरी दृष्टीक्षेपात, रेल्वे मार्गासाठी 4857 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

मोठ्या प्रतीक्षेनंतर सोलापूर ते धाराशिव रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता धाराशिवकरांना रेल्वेनेच थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत जाता येणार आहे. यासाठी 240 किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासाठी 4857 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून राज्य शासनाचा यात अर्धा वाटा असणार आहे. या रेल्वेमार्गाची मंजुरी अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रेटा वाढवल्यास त्याच्या मंजुरीची प्रक्रिया लवकरच अंतिम होऊ शकते.

Feb 17, 2025 07:23 (IST)

Live Update : तुळजापुरात विक्रीसाठी ड्रग्स घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

तुळजापुरात विक्रीसाठी ड्रेस घेऊन येत असणाऱ्या तीन आरोपींना 59 ड्रग्सच्या पुड्यांसह तामलवाडी येथे पोलिसांनी अटक केली होती. या तिन्ही आरोपींना धाराशिव कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे. हे ड्रग्स मुंबई येथून एका महिलेकडून आणल्याची कबुली आरोपींनी दिल्याने त्याचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. हे ड्रज कोणाला विकले जाणार होते? ड्रग्स खरेदी करणारे आता पोलिसांच्या रडावर आहेत.

Feb 17, 2025 07:21 (IST)

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर 

फडणवीस आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला  दुपारी तीन वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील उपस्थित राहणार आहेत