Omar Abdullah Speech: कोणत्या तोंडाने माफी मागू..' काश्मीरचे CM ओमर अब्दुल्ला हळहळले, जनतेलाही सॅल्यूट केला!

आपली आजची कथा नाही दुर्दैवाने बैसरनमध्ये पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झाली. आता माहिती नाही पुढचा हल्ला कुठे होईल?" असे ओमर अब्दुला म्हणाले.

जाहिरात
Read Time: 3 mins

जम्मू काश्मीर: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर आज जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध करताना पर्यटकांसाठी काश्मीरच्या लोकांनी जिवाची बाजी लावली, 26 वर्षात मी असे चित्र पाहिले नाही.. असे महत्त्वाचे विधान केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?

'हा काश्मीरमध्ये झालेला पहिला हल्ला नव्हता आम्ही आजपर्यंत अनेक हल्ले पाहिलेत. अमरनाथचा हल्ला, टोडा, काश्मीरी पंडितांच्या वस्त्यांवर हल्ले पाहिले. मात्र मागच्या काही वर्षानंतर हा सर्वात मोठा हल्ला आहे. ही आपली आजची कथा नाही दुर्दैवाने बैसरनमध्ये पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झाली. आता माहिती नाही पुढचा हल्ला कुठे होईल?" असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

"त्यादिवशी मी सुद्धा विरोधकांसोबत पोलीस नियंत्रण कक्षात होतो ज्यावेळी आम्ही 26 जणांना श्रद्धांजली वाहिली. माझ्याजवळ शब्द नव्हते की मी कशी त्यांच्या कुटुंबियांची माफी मागू.. जम्मू काश्मिरची सुरक्षा, जम्मू काश्मीरची स्थिती त्यांनी निवडून दिलेल्यांच्या हाती नाही हे माहित आहे पण पर्यटकमंत्री म्हणून माझ्याकडे शब्द नव्हते. काय बोलणारहोतो त्यांना.. त्या छोट्या मुलांना ज्यांनी आपल्या आई वडिलांना मरताना पाहिले. त्या नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीला ज्यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते..." असे म्हणत अब्दुल्ला यांनी हळहळ व्यक्त केली. 

नक्की वाचा - Mumbai News: परफेक्ट नियोजन अन् करेक्ट कार्यक्रम... मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुसाट!

"काही जण म्हणाले आमची काय चूक होती. आम्ही पहिल्यांदाच सुट्टी एन्जॉय करायला आलेलो. आम्हाला त्या सुट्टीची आता आयुष्यभर किंमत मोजावी लागली.  ते म्हणतात आमच्या भल्यासाठी केले. पण आम्ही असे म्हणालो होतो का आमच्यापैकी कोणीही या हल्लेखोरांच्या सोबत नाही. या हल्ल्याने आम्हाला पोखरुन काढले आहे. खूप अवघड आहे यातून मार्ग काढणे," असेही ते म्हणाले.

"मात्र 26 वर्षात मी पहिल्यांदाच जम्मू काश्मी रमध्ये असे लोकांना बाहेर पडताना पाहिले नाही. कठुआपासून सर्वत्र लोकांनी बाहेर पडत या हल्ल्याचा निषेध केला. हे लोकांचे बाहेर पडणे यामध्ये आपल्या कुणाचा हात नाही. आम्हीही त्यांचाच मार्ग अवलंबला पण ही गाडी त्यांनीच हाकली... लोकांनी मेणबत्ती पेटवली हे दाखवण्यासाठी की आम्ही त्यांच्यासोबत नाही"

"अशा हल्ल्यांचा खात्मा तेव्हाच होईल जेव्हा लोक बाहेर पडतील त्याची ही सुरुवात आहे. आपणही त्यांच्यासोबत एकवटले पाहिजे.  आपण बंदूक घेऊन त्यांना रोखू शकतो पण संपवू शकत नाही. आपण त्यांना तेव्हाच संपवू जेव्हा लोक आपल्यासोबत असतील. जम्मू काश्मीरच्या लोकांनी पर्यटकांसाठी जीवाची बाजी लावली.. मी त्यांना सलाम करतो हाच आमचा पाहुणचार आहे.." असे म्हणत त्यांनी काश्मीरच्या जनतेच्या मदतीचे कौतुक केले. 

नक्की वाचा - Jalgaon Crime : तृप्ती 4 महिन्यांची गर्भवती, बापाने लग्नातच गोळ्या झाडल्या, ऑनर किलींगची भयंकर स्टोरी