CNG Price Drop: CNG आणि PNG च्या दरात मोठी कपात, 1 जानेवारीपासून स्वस्त होणार, जाणून घ्या नवे दर

या निर्णयाचा फायदा देशातील 40 गॅस वितरण कंपन्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या 312 भौगोलिक क्षेत्रांना मिळणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने CNG व PNG च्या किमतीत कपात जाहीर केली आहे
  • गॅस वितरणासाठी पूर्वीच्या तीन झोनच्या रचनेऐवजी आता फक्त दोन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे
  • देशातील सीएनजी आणि घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी झोन एकाचा दर प्रति युनिट 54 रुपये निश्चित करण्यात आला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

CNG Price Drop Jan 1: नवीन वर्ष 2026 ची सुरुवात भारतीय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) गॅस दरांच्या रचनेत (Tariff Rationalization) मोठे सुधार जाहीर केले आहेत. यामुळे 1 जानेवारीपासून देशभरात CNG (काँप्रेसड नॅचरल गॅस) आणि PNG (पाईप्ड नॅचरल गॅस) च्या किमतीत प्रति युनिट 2 ते 3 रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव वर्षाच्या सुरूवातीलाच हा निर्णय होणार असल्याने ही आनंदाची बातमी समजली जात आहे. 

नक्की वाचा - Lungs Cancer: खोकला येण्यापूर्वीच 'या' दोन गोष्टी देतात कॅन्सरचे संकेत, वेळीच ओळखा नाहीतर होईल घात

झोन रचनेत बदल PNGRB चे सदस्य ए.के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस वितरणाची प्रक्रिया आता अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे. पूर्वी अंतराच्या हिशोबाने तीन झोनमध्ये दर आकारले जात होते, ते आता केवळ दोन झोनमध्ये विभागले गेले आहेत. नव्या नियमांनुसार, देशभरातील सीएनजी आणि घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी 'झोन 1' लागू होईल. या झोनसाठीचा दर आता 54 रुपये निश्चित करण्यात आला आहे. जो पूर्वी 80 ते 107 रुपयांपर्यंत होता. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार 2 ते 3 रुपयांनी कमी होणार आहे.

नक्की वाचा - चहा सोबत काय खावू नये? 'हे' पदार्थ खाणे टाळा नाही तर अनेक समस्यांचे व्हाल शिकार

या निर्णयाचा फायदा देशातील 40 गॅस वितरण कंपन्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या 312 भौगोलिक क्षेत्रांना मिळणार आहे. यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या कार, रिक्षा आणि बसचा प्रवास खर्च कमी होईल, तसेच घराघरांत वापरला जाणारा पाईप्ड गॅसही स्वस्त होणार आहे. कंपन्यांनी या कपातीचा थेट लाभ ग्राहकांना द्यावा, यासाठी नियामक मंडळ विशेष लक्ष ठेवणार आहे. या निर्णयामुळे नव वर्षाच्या सुरूवातीलाच सर्वांना दिलासा निश्चितच मिळणार आहे. 

Topics mentioned in this article