
Co-founder of Rippling Prasanna Shankar : तामिळनाडूत जन्मलेले, सिंगापूरचे टेक उद्यमी आणि रिप्लिंगचे सहसंस्थापक प्रसन्ना शंकर सध्या त्यांच्यावरील गंभीर आरोपामुळे चर्चेत आहेत. घटस्फोटानंतर प्रसन्ना यांच्या पत्नी दिव्या शशीधरने पतीविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. घटस्फोट आणि मुलाचा ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या लढाईदरम्यान शशीधरने शंकरवर अनेक आरोप केले आहेत. प्रसन्ना शंकरने तिला ओपन मॅरेजसाठी जबरदस्ती केली होती. ज्यामध्ये इतर व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवण्याची परवानगी होती. याशिवाय शंकरने वेश्यांसोबत शरीरसंबंध ठेवल्याचा आणि तिचा छळ केल्याचं दिव्याने आपल्या कोर्टात दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रिप्पलिंगचे सह-संस्थापक प्रसन्ना शंकर यांची संपत्ती 1.3 बिलियन डॉलर इतकी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीनुसार पोलीस त्यांना ट्रॅक करीत आहे. दिव्यासह प्रसन्ना शंकर यांनीही पत्नीवर अनेक आरोप केले आहेत. पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते. सॅन फ्रान्सिस्को स्टँडर्डच्या वृत्तानुसार, दिव्याने दावा केला आहे की, प्रसन्ना शंकर तिच्यासोबत शरीरसंबंधासाठी जबरदस्ती करीत होता. तो वेश्यांसोबत संबंध ठेवायचा. पत्नीवर नजर ठेवून असायचा आणि तिच्या सर्व हालचाली रेकॉर्ड करीत असेत. इतकच नाही तर बाथरूममध्येही तिच्या हालचाली रेकॉर्ड केल्या जात होत्या.
नक्की वाचा - Meerut Murder Case : पतीला ठार मारणारी मुस्कान Pregnant, वाचा काय आहेत गर्भवती महिलांसाठी जेलचे नियम
डिलिव्हरीनंतरही ठेवले शरीरसंबंध...
दिव्याने असाही दावा केला आहे की, प्रसन्नाने डिलिव्हरीनंतरही तिच्यासोबत सेक्स केला. डिलिव्हरीनंतर तिला प्रचंड वेदना होत होत्या. तरीही प्रसन्नाने शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. दिव्याच्या दाव्यानुसार, प्रसन्न म्हणायचा की 'सेक्स त्याची बेसिक आवश्यकता आहे. तू कितीही त्रासात असली तरीही तुला शरीरसंबंध ठेवावेच लागतील. अन्यथा बाहेर कोणाकडे शरीरसंबंधासाठी जाईल'.
प्रसन्नाचे आरोप काय आहेत ?
पत्नीच्या आरोपावर प्रसन्नाने सांगितलं की, त्याच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. त्यांना नऊ वर्षांचा मुलगाही आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते आणि तिचे त्या व्यक्तीसोबतचे मेसेज आणि हॉटेल बुकिंगचे स्क्रीनशॉट शेअर केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world