LPG Cylinder : दिवाळीच्या दिवशी मोठा झटका, गॅस सिलेंडरच्या दरात 62 रुपयांची वाढ

LPG Cylinder : ऑक्टोबर महिन्यातही  व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली होती. मागच्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपये ते 50 रुपयांनी वाढ करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र महागाईची झळ सर्वसामन्यांना बसत आहे. अशात दिवाळीच्या दिवसातच आणखी एक झटका नागरिकांना बसला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 62 रुपयांची वाढ झाली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तेल कंपन्या दरमहिन्याच्या पहिल्या दिवशी गॅल सिलेंडरचे नवे दर जारी करतात. त्यानुसार आज तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरांनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. नव्या दरांनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत मुंबईत 1754.50 रुपये झाले आहे. तर दिल्लीत हे दर 1802, कोलकातामध्ये 1911.50 रुपये तर चेन्नईमध्ये 818 रुपये झाले आहेत. 

Advertisement

ऑक्टोबर महिन्यातही  व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली होती. मागच्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपये ते 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. सर्वसामान्यांना दिलासा म्हणजे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.  

(नक्की वाचा-  योजना बंद झाली तर? विरोधकांच्या आरोपांना जाहिरातीद्वारे उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न)

जुलै महिन्यापासून किंतमी किती वाढली? 

जुलै 2024 पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.  1 जुलै 2024 रोजी तेल कंपन्यांनी LPG किमतीत कपातीची भेट दिली होती. मात्र पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 8.50 रुपयांनी महागला. त्यानंतर सप्टेंबरला महिन्यातही सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसला. ऑक्टोबर महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली होती. 

(नक्की वाचा: लाडक्या बहिणीचा महायुतीतील लाडका भाऊ कोण? सुनील तटकरे कुणाचं नाव घेतलं?)

कोणला बसणार फटका? 

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि ढाब्यांच्या खाद्यपदार्थांच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. या ठिकाणी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world