प्रेमाचं नाटक, फसवणूक आणि खंडणीचे आरोप! DSP कल्पना वर्मा आणि व्यावसायिकाच्या CCTV, चॅट्समुळे खळबळ

DSP Kalpna Verma Case: सध्या दंतेवाडा येथे कार्यरत असलेल्या डीएसपी कल्पना वर्मा यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी या वादाला संपूर्णपणे निराधार ठरवले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
DSP kalpana Varma
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • रायपुर के कारोबारी दीपक टंडन ने छत्तीसगढ़ की DSP कल्पना वर्मा पर दो करोड़ रुपए ठगने का आरोप लगाया है.
  • दीपक टंडन ने पुलिस को व्हाट्सएप चैट और सीसीटीवी फुटेज सहित कई सबूत पेश किए हैं, जिसमें दोनों साथ दिख रहे हैं.
  • DSP कल्पना वर्मा ने आरोपों को निराधार बताया और कहा कि यह विवाद उनके पद या व्यक्तिगत जीवन से संबंधित नहीं है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

DSP Kalpana Verma Case: छत्तीसगढ पोलीस दलातील 2017 बॅचच्या डीएसपी (DSP) कल्पना वर्मा सध्या सोशल मीडियावर एका हाय-प्रोफाईल वादामुळे चर्चेत आहेत. रायपूरचे व्यावसायिक दीपक टंडन यांनी त्यांच्यावर प्रेमाचं नाटक करून फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, यात आता डीएसपी कल्पना वर्मा यांनीही आपली बाजू मांडली आहे.

व्यावसायिकाचे गंभीर आरोप

दीपक टंडन यांनी खम्हारडीह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटलं की, 2021 मध्ये भेट झाल्यानंतर दोघांमध्ये संबंध वाढत गेले. या संबंधांदरम्यान डीएसपी कल्पना वर्मा यांनी त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी केली. टंडन यांनी हळूहळू 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कल्पना यांना दिली. याशिवाय त्यांनी कल्पना यांना 12 लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी, 5 लाख रुपयांची सोन्याची चेन आणि टॉप्स आणि 1 लाख रुपयांचे ब्रेसलेट भेट दिल्याचेही त्यांनी सांगितलं.

कार आणि हॉटेल

कल्पना यांनी त्यांच्याकडून इनोव्हा क्रिस्टा कार (Innova Crysta) घेतली. एवढेच नाही तर, डीएसपीने आपल्या भावाच्या नावावर असलेला रायपूरच्या व्हीआयपी रोडवरील एक हॉटेल देखील बळकावले आणि नंतर 30 लाख रुपये खर्च करून ते स्वतःच्या नावावर करून घेतले.

महिला अधिकाऱ्याने आपल्याला बनावट खटल्यात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी दिल्याचा आरोपही टंडन यांनी केला आहे. टंडन यांनी त्यांच्या आरोपांना पुरावा म्हणून व्हॉट्सॲप चॅट आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजसह अनेक पुरावे पोलिसांना सादर केले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)

डीएसपी कल्पना वर्मा यांची बाजू

सध्या दंतेवाडा येथे कार्यरत असलेल्या डीएसपी कल्पना वर्मा यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी या वादाला संपूर्णपणे निराधार ठरवले आहे. कल्पना वर्मा यांनी सांगितले की, त्यांचे वडील आणि दीपक टंडन यांच्यात पूर्वीपासून एक व्यवसायिक संबंधांवरून वाद होते. हे प्रकरण न्यायलयात आहे. या व्यवहारात टंडन यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाचा चेक दिला होता, जो बाऊन्स झाला होता.

(नक्की वाचा-  Dombivli News: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोळेगावमध्ये 21 डिसेंबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल)

या न्यायिक प्रक्रियेपासून वाचण्यासाठी दीपक टंडन जाणीवपूर्वक आपले नाव यात ओढून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा संपूर्ण विवाद त्यांच्या पद किंवा व्यक्तिगत जीवनाशी संबंधित नाही. कल्पना यांनी आरोप केला की, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो आणि सोशल मीडियावरील कंटेन्ट वापरून बनावट चॅट्स तयार करण्यात आले आहेत, जो एक गुन्हा आहे. त्यांनी कायदेशीर सल्ला घेऊन कायद्याच्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Advertisement

कल्पना वर्मा यांनी दीपक टंडन यांच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित करत विचारले की, टंडन यांची पत्नी किंवा टंडन यांनी स्वतः यापूर्वी कधी तक्रार का केली नाही? कोर्टात पैसे देण्याची वेळ आल्यावरच त्यांना हे सर्व कसे आठवले, असा सवाल कल्पना यांनी केला आहे.