मंगेश जोशी, प्रतिनिधी
दानापूर पुणे एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली असून या तांत्रिक बिघाडामुळे दानापूर ते भुसावळ दरम्यान ही गाडी तब्बल 17 तास उशिरा धावत आहे. इंजिन आणि कोचमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाडीमध्ये प्रेशर निर्माण होऊ न शकल्याने परिणामी गाडी उशिरा धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र नेमका काय बिघाड झाला याचा रेल्वे प्रशासनाकडून शोध सुरू आहे. दरम्यान गाडी तब्बल 17 तास उशीरा धावत असल्याने प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून भुसावळ रेल्वे स्थानकावर ही गाडी इंजिनसह संपूर्ण रॅक बदलून रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी व रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना दुसऱ्या गाडीत स्थलांतरित करत अखेर ही गाडी पुण्याकडे रवाना करण्यात आली.
दानापूर पुणे एक्स्प्रेस बिहार ते महाराष्ट्र असा प्रवास करते. यासाठी एक्स्प्रेसला साधारण 30 ते 31 तास लागतात. मात्र नेहमीपेक्षा या एक्स्प्रेसला 17 तास अधिक लागले. म्हणजे बिहार ते पुण्यापर्यंत येण्यात जवळपास ४८ तासांचा प्रवास करावा लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
दानापूर पुणे एक्सप्रेस मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही एक्स्प्रेस तब्बल 17 तास उशीराने धावत आहे. इंजिन आणि कोचच्या तांत्रिक बिघाडामुळे भुसावळ रेल्वे स्थानकावर बदलण्यात आली गाडी. भुसावळ रेल्वे स्थानकावर इंजिनसह संपूर्ण गाडीचा रॅक बदलून गाडी पुण्याकडे रवाना करण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे गाडी तब्बल 17 तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलीस यांनी तांत्रिक बिघाड असलेली गाडी रिकामी करत दुसऱ्या गाडीत प्रवाशांना बसवण्यास मदत केली.