Adult Movies Industry Inside Story : भारत सरकारने अश्लील कंटेन्ट प्रसारित करणाऱ्या 25 ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईट्सवर बंदी घातली आहे. यामध्ये उल्लू,बिग शॉट्स सारख्या मोठ्या कंपनींचा समावेश आहे. अडल्ट कंटेन्ट इंडस्ट्रीला जोरदार विरोध होत असल्याचं नुकतंच समोर आलं होतं. देशात अडल्ट कंटेन्ट बनवणाऱ्यांचा निषेधही काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. अशातच अडल्ट फिल्म एक्टर शेक्सपिअर त्रिपाठीने एका मुलाखतीत या इंडस्ट्रीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अडल्ट कंटेन्ट बनवणाऱ्या इंडस्ट्रीज कशाप्रकारे काम करतात, कलाकारांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? पडद्यामागे सर्व काही किती प्रोफेशनल असतं? याची इनसाईड स्टोरीच त्रिपाठी यांनी सांगितली आहे.
जजमेंट आणि पैशांच्या मागणीमुळं या इंडस्ट्रीला
अडल्ट इंडस्ट्रीत काम करण्याबाबत शेक्सपिअर त्रिपाठीने मुलाखतीत उघडपणे यामागची कारणे सांगितली आहेत. त्याने म्हटलंय की, त्यांना समाजात खूप जास्त जज केलं जातं आणि विरोधालाही सामोरं जावं लागतं. त्याने खुलासा केला की, या इंडस्ट्रीत येण्याआधी त्यांनी एका क्रिकेटरसोबत एड फिल्म केली होती. तसच अनेक प्ले आणि शो मध्येही काम केलं होतं. मी ऑडिशन देत होतो, पण मला कुठेही यश मिळालं नाही. मला काम मिळत नव्हतं. मला पैशांची खूप गरज होती.म्हणून मी अडल्ट इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला.
नक्की वाचा >> Uber ड्रायव्हरने तरुणीला कॉलेजला सोडलं,पण नंतर घडला विचित्र प्रकार, मुलीनं WhatsApp चे स्क्रीनशॉट केले व्हायरल
बॉलिवूडसारखंच होतं अडल्ट फिल्मचं शूट
शेक्सपिअर त्रिपाठीने म्हटलं, अडल्ट फिल्मचं शूटिंग खूप प्रोफेशनल पद्धतीने होतं. त्याने आधी शूटिंगचा अनुभव शेअर करत सांगितलं की, पहिलं शूट खूप मोठ्या बंगल्यात झालं होतं. शूटिंगमध्ये मेकअप आर्टिस्ट, डायरेक्टर, प्रोड्युसर, स्पॉट बॉय सर्व लोक असतात. इथे प्रोफेशनल स्क्रीप्ट्स असतात. सर्वकाही प्रोफेशनल असतं.आम्हा सर्वांचं एक वेगळं रुम असतं. ज्या प्रकारे एक बॉलिवूड फिल्म बनते, तशाच प्रकारे हे फिल्म बनवलं जातं. एक्ट्रेस सोबत नेहमीच एक स्पॉट बॉय असतो. जो त्यांची सर्व कामे करतो.
अडल्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या मजबुरीबाबत अनेक मिथ्स पसरवले जातात. याबाबत शेक्सपिअर त्रिपाठीनने एक धक्कादायक दावा केला आहे. अडल्ट इंडस्ट्रीमध्ये जो कोणी कलाकार दिसतात, ते सर्व त्यांच्या मर्जीने येतात.या इंडस्ट्रीत जबरदस्ती किंवा प्रॉस्टिट्यूशन सारखं कोणतंही काम होत नाही, असंही शेक्सपिअर त्रिपाठी म्हणाले. फिल्ममध्ये काम करण्याआधी अभिनेत्रींकडून फॉर्म फिल केलं जातं. त्यांचा आधारकार्डही घेतला जातो. या इंडस्ट्रीत अशाही तरुणी आहेत, त्यांनी मिस इंडियासारखे कॉन्टेस्ट जिंकले आहेत.
नक्की वाचा >> यशस्वी जैस्वाल OUT की NOT OUT? अंपायरने केलं मोठं ब्लंडर..नेमकी चूक कोणाची? Video ने उडवली खळबळ