जाहिरात

IND vs WI: यशस्वी जैस्वाल OUT की NOT OUT? अंपायरने केलं मोठं ब्लंडर..नेमकी चूक कोणाची? Video ने उडवली खळबळ

IND vs WI: यशस्वी जैस्वाल OUT की NOT OUT? अंपायरने केलं मोठं ब्लंडर..नेमकी चूक कोणाची? Video ने उडवली खळबळ
Yashasvi Jaiswal Run Out Video
मुंबई:

Yashasvi Jaiswal Run Out Video, IND vs WI :  भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालने वेस्टइंडिज विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात धावांचा पाऊस पाडला. अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये जैस्वाली डबल सेंच्युरी थोडक्यात हुकली. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये जैस्वाल रन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. जैस्वालने 92 व्या ओव्हरमध्ये जायडेन सील्सच्या फुल लेन्थ चेंडूला मिड-ऑफच्या दिशेनं ड्राईव्ह केलं. त्याचदरम्यान, जैस्वाल रन काढण्यासाठी धावला,पण गिलने रन काढताना जैस्वालला प्रतिसाद दिला नाही. जैस्वाल क्रिजवर रिटर्न पोहचेपर्यंत तेविन इमलाचने त्याला रनआऊट केलं होतं. जैस्वालने 258 चेंडूत 22 चौकारांच्या मदतीने 175 धावांची अप्रतिम खेळी केली. जैस्वाल भारतासाठी वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या करणारा तिसरा खेळाडू बनला आहे.

कसा झाला यशस्वी जैस्वाल रनआऊट?

ज्याप्रकारे जैस्वाल आऊट झाला, त्याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. जैस्वाल क्रिजच्या खूप बाहेर होता, पण विकेटकिपरने ज्या स्टाईलने जैस्वालला रन आऊट केलं..ते पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. विकेटकिपरने जेव्हा त्याचे हात स्टंप्सला लावले, तेव्हा चेंडू त्याच्या ग्लोव्जमधून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. पण थर्ड अंपायरला वाटलं की, चेंडू स्टंपला लागून निघाला आहे. त्यामुळे जैस्वाल रन आऊट असल्याचा निर्णय देण्यात आला. 

नक्की वाचा >> धोनी दिसताच लिटल शिष्य धावत आला, चिमुकल्या खेळाडूनं स्टेडियममध्ये जे केलं..माहीलाही अभिमान वाटला! Video बघाच

अनिल कुंबळेनं अंपायरच्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी

भारताचा माजी स्टार स्पिनर अनिल कुंबळेनं कॉमेन्ट्री करत असताना या रनआऊटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलं की, अंपायरने प्रत्येक अँगलने रनआऊटचा रिप्ले पाहायला हवं होतं. तसच निर्णय घोषित करण्याआधी थोडा वेळ घेणं आवश्यक होतं.

कोणाची होती चूक?

जैस्वालने फटका मारताच रन काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जैस्वालने रन काढण्याचा पहिला कॉल दिला होता. पण चेंडू फिल्डरच्या हातात गेला होता. अशा परिस्थितीत कोणाची चूक होती, हे सांगण कठीण आहे. पण दोन्ही फलंदाजांमध्ये रन काढण्यासाठी जी तत्परता हवी होती, त्यामध्ये थोडी कमी असल्याचं मैदानात पाहायला मिळालं. 

जैस्वालचं द्विशतक हुकलं, गिल झाला नाराज

यशस्वी जैस्वाल रन आऊट झाल्यानंतर कर्णधार गिलबाबत नाराज असल्याचं समोर आलं. त्याने काही वेळ गिलकडे पाहिलं आणि त्याची नाराजी व्यक्त केली. गिलही जैस्वाल बाद झाल्यानंTeam India Best Captain : कोण आहे टीम इंडियाचा नंबर वन ODI कॅप्टन? रोहित शर्माचा नंबर वाचून थक्कच व्हालतर दु:खी झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 

नक्की वाचा >> 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com