Defence Ministry Rejects L&T 70,000 Crore Submarine Deal: संरक्षण दलाने देशातील (Indian Defence Ministry) दिग्गज कंपन्यांपैकी एक असलेल्या लार्सन अँड टुब्रोला (Larsen And Toubro) चांगलाच झटका दिला आहे. सरकारने सहा पाणबुड्या विकत घेण्यासाठी 70 हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. यासाठी एल अँड टीने देखील बोली लावली होती. मात्र त्यांची बोली फेटाळण्यात आली आहे. कंपनीने अटी-शर्तींचे पालन न केल्याने त्यांची बोली फेटाळण्यात आल्याचे संरक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. भारतीय नौदलासाठी अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्यात येणार आहेत. तीन आठवड्यांपर्यंत पाण्यात राहू शकतील, अशा पाणबुड्या खरेदी करण्यासाठी निविदा जारी करण्यात आली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ANI ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या निविदेसाठी एल अँड टीने स्पेनची कंपनी नॅवेंटीयाशी हातमिळवणी करत बोली लावली होती. मात्र नौदलाच्या गरजेनुसार त्यांच्या बोलीमध्ये तरतुदी दिसत नसल्याने त्यांची बोली फेटाळण्यात आली. प्रोजेक्ट 75 अंतर्गत या पाणबुड्या खरेदी करण्यात येत आहेत आणि 'एल अँड टी' ही पूर्वीपासून पाणबुडी प्रकल्पाचा भाग राहिलेली आहे हे विशेष. एल अँड टी स्पर्धेतून बाहेर झाल्याने आता माझगाव डॉक ही कंपनी स्पर्धेत उरली आहे. माझगाव डॉकने जर्मनीची कंपनी थस्सिनक्रूप सिस्टिमच्या सहकार्याने या निविदेसाठी बोली लावली आहे.
(नक्की वाचा :घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला)
90 तास काम करण्याच्या सल्ल्यामुळे वाद
काही दिवसांपूर्वी एल अँड टी कंपनी तिचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाचा केंद्रबिंदू बनली होती. कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सुब्रह्मण्यन यांनी घरात बसून बायकोचे तोंड किती वेळ पाहात बसणार, त्यापेक्षा ऑफिसला या. 90 तास काम करा, असा सल्ला दिला होता. मला शक्य झालं असतं तर मी कर्मचाऱ्यांना रविवारीही काम करायला लावलं असतं, असं त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर उद्योगजगतातून संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या होत्या.