CM Arvind Kejriwal resigns : केजरीवालांची मोठी घोषणा, 2 दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाच्या ( Delhi Chief Minister Arvind Kejriwal resigns) राजीनाम्याची घोषणा केली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाच्या ( Delhi Chief Minister Arvind Kejriwal resigns) राजीनाम्याची घोषणा केली आहे. तिहार तुरुंगातून 13 सप्टेंबर रोजी बाहेर पडल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पहिल्यांदा आम आदमी पार्टीच्या ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यादरम्यान त्यांच्यासोबत AAP चे नेता मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि आतिशीदेखील उपस्थित आहेत. 

यावेळी केजरीवाल म्हणाले, पुढील दोन दिवसात मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता आपला निर्णय देत नाही तोपर्यंत त्या खुर्चीवर बसणार नाही. जोपर्यंत जनता म्हणत नाही केजरीवाल प्रामाणिक आहे, तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. अरविंद केजरीवालांवर मद्य धोरण घोटाळ्याचा आरोप लागला, ते तुरुंगात गेले होते. त्या काळातही अरविंद केजरीवाल यांनी कधीच राजीनाम्याबद्दल चकार शब्द काढला नाही. मात्र आज केजरीवालांनी दोन दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. 

केजरीवाल काय म्हणालेः

  •  मी आणि मनीष सिसोदिया जनतेच्या दरबारात जाणार
  •  मला जनतेला विचारायचंय की तुम्ही मला प्रामाणिक मानता की गुन्हेगार ? 
  •  मी येत्या दोन दिवसात आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे.
  •  मी प्रामाणिक असल्याचं जोपर्यंत जनता निर्णय देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही.
  •  मनीष सिसोदिया मुख्यमंत्री बनणार नाहीत.