दिल्ली: दिल्लीच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना त्या त्यांच्या निवासस्थानी जनता दरबार सुरु असताना घडली. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. या हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाने निषेध केला असून चौकशीतून सर्व स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी व्यक्तीने प्रथम मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर दगडासारखे काहीतरी फेकले, परंतु त्याचा नेम चुकल्याने मुख्यमंत्र्यांना काही इजा इजा झाला नाही. त्यानंतर त्याने पुन्हा मुख्यमंत्र्यांना मारहाण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपी व्यक्तीने प्रथम दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा तो त्याच्या हेतूत यशस्वी झाला नाही तेव्हा त्याने सीएम रेखा गुप्ता यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाबद्दल आरोपीची चौकशी करत आहेत. आरोपी कुठून आला आणि मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याचे कारण काय होते हे देखील पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्र्यांवरील हल्ला दुर्दैवी
दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वीरेंद्र सचदेवा म्हणाले की हे खूप दुर्दैवी आहे. दिवसाचे १८ तास काम करणाऱ्या एका महिला मुख्यमंत्री दर आठवड्याला सार्वजनिक सुनावणी घेतात. एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, दिल्ली पोलिस त्याची चौकशी करत आहेत. त्याच्याकडे कागदपत्रांचा गठ्ठा होता. मुख्यमंत्र्यांनी फोनवर बोलणे केले आहे आणि त्यांच्याकडे अद्याप फारशी माहिती नाही.