अशक्य ते शक्य! 5 महिन्यांच्या गरोदरपणात कॅन्सरचे निदान, डॉक्टर-रुग्णाच्या हिंमतीने वाचले माय-लेकराचे प्राण

Inspiration Story : कॅन्सरला अजूनही एक असाध्य रोग मानले जाते. पण दिल्लीच्या डॉक्टरांनी एका कॅन्सर रुग्णावर चमत्कार केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कॅन्सर झाल्याचं कळताच महिलेचं कुटुंब घाबरलं होतं. (AI Photo)
मुंबई:

Inspiration Story : कॅन्सरचा (Cancer) फक्त उल्लेख जरी झाला तरी लोकं घाबरून जातात. रुग्णाची अवस्था तर सोडाच, पण त्याच्या कुटुंबातील सदस्य देखील या आजाराच्या लांब आणि गुंतागुंतीच्या उपचारांचा विचार करून अस्वस्थ होतात. तुम्ही कधी कॅन्सरच्या रुग्णाच्या उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये चक्कर मारली असेल तर तुम्हाला याची जाणीव होईल. कॅन्सरला अजूनही एक असाध्य रोग मानले जाते. पण दिल्लीच्या डॉक्टरांनी एका कॅन्सर रुग्णावर असा चमत्कार केला आहे. त्यांचा चमत्कार वाचल्यावर तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल.

गरोदरपणात कॅन्सर…

दिल्लीतील 35 वर्षांच्या महिलेला 5 महिन्यांच्या गरोदरपणात कॅन्सर झाल्याचे निदान झाले. आजार कळताच महिलेसह तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. पण नंतर डॉक्टरांच्या मेहनतीने महिलेवर योग्य उपचार केले आणि असा चमत्कार करून दाखवला ज्याची कल्पना करणेही कठीण होते.

डॉक्टरांच्या या उपचाराने हे सिद्ध झाले आहे की, गरोदरपणातही स्तनाच्या कॅन्सरवर (Breast Cancer) यशस्वी उपचार करता येतात. नवी दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये हे शक्य झाले आहे.

( नक्की वाचा : 'स्किन कॅन्सर'ने ऑस्ट्रेलियाच्या 'या' महान खेळाडूला गाठले; सोशल मीडियावर भावुक पोस्ट )
 

हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी गरोदरपणात स्तनाच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या महिलेवर यशस्वी उपचार करून आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचवले. वैद्यकीय क्षेत्रात हे एक मोठे यश मानले जात आहे. 35 वर्षीय गरोदर महिला जुलै 2024 मध्ये स्तनात गाठ असल्याची तक्रार घेऊन हॉस्पिटलमध्ये आली होती.

Advertisement

या महिलेच्या तपासणीमध्ये त्यांना ट्रिपल-पॉझिटिव्ह इनवेसिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचे (Triple-Positive Invasive Breast Cancer) निदान झाले. तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर, महिलेने आधी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. सर गंगा राम हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे को-चेअरपर्सन डॉ. राकेश कुमार कौल यांनी यशस्वीरित्या मॅस्टेक्टॉमी (स्तन काढण्याची शस्त्रक्रिया) केली.

या ऑपरेशननंतर दुसऱ्या तिमाहीपासून सुरक्षितपणे केमोथेरपी (Chemotherapy) सुरू करण्यात आली. सर गंगा राम हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे चेअरपर्सन डॉ. श्याम अग्रवाल म्हणाले, “पहिल्या तिमाहीनंतर दिलेली केमोथेरपी गर्भासाठी सुरक्षित असते.”

Advertisement

महिलेला गरोदरपणात Paclitaxel चे 12 सायकल्स देण्यात आले. जानेवारी 2025 मध्ये तिने सामान्य प्रसूतीद्वारे एका निरोगी बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर महिलेला ॲडजुव्हेंट केमोथेरपी (Adjuvant Chemotherapy), रेडिओथेरपी (Radiotherapy), टार्गेटेड आणि हार्मोनल थेरपी (Targeted and Hormonal Therapy) देण्यात आली.

आई आणि बाळ दोघेही सुरक्षित

डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं की “टीमवर्क आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मदतीनं कॅन्सरवर उत्तम उपचार करता येतात.” तर “गरोदरपणातही वेळेवर उपचार केल्यास स्तनाचा कॅन्सर हरवता येतो.” असं डॉ. कौल यांनी या विषयावर बोलताना सांगितलं. 
 

Advertisement
Topics mentioned in this article