Read more!

Delhi election results 2025 : AAP आणि Congress सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या उमेदवारांचे काय झाले ?

दिल्लीमध्ये एकूण 70 जागा असून इथे बहुमतासाठी 36 जागा जिंकणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाने इथे 48 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

Election Results Delhi 2025 Updates : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल (Delhi Assembly Election Result) लागले आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला भोपळाही (Congress Fails To Open Account In Delhi Election) फोडता आला नाही. सत्ताधारी 'आप'ला धक्क्यावर धक्के बसले (AAP lost Delhi Election 2025) असून भाजपने त्यांना सत्तेवरून खाली खेचले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले. दिल्लीमध्ये एकूण 70 जागा असून इथे बहुमतासाठी 36 जागा जिंकणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाने इथे 48 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काही नेत्यांनी आप आणि काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. यातील काहींना भाजपने उमेदवारीही दिली होती. या उमेदवारांचे काय झाले ते पाहूयात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अरविंदर सिंग लवली यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने गांधी नगर विधानसभा  मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघातून त्यांनी आम आदमी पार्टीच्या नवीन चौधरी यांचा पराभव केला.

Advertisement

नक्की वाचा :अरविंद केजरीवाल यांना पाडणारे 'जायंट किलर'; कोण आहेत परवेश वर्मा?

प्रियंका गौतम या आम आदमी पक्षाच्या नेत्या होत्या. निवडणुकीपूर्वी त्यांनी आप सोडून भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनाही भाजपने उमेदवारी दिली होती. कोंडली मतदारसंघातून त्या निवडणूक लढल्या. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कुलदीप कुमार यांनी त्यांचा  6,293  मतांनी पराभव केला. प्रियंका गौतम या आपच्या नेगरसेविका होत्या. प्रियंका गौतम यांच्याप्रमाणेच आपच्या राजकुमार आनंद यांनीही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. पटेल नगर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढली होती. त्यांचाही पराभव झाला असून त्यांनाही आपच्याच उमेदवाराने पराभूत केले आहे. आम आदमी पक्षाच्या प्रवेश रत्न यांनी इथून विजय मिळवला असून या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या नंबरवर राहिला. 

नक्की वाचा-  Delhi Election Results 2025 : दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'या' नावांची सर्वाधिक चर्चा

बिजवासन मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कैलाश गहलोत हे देखील पूर्वी आम आदमी पक्षात होते, निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता.  गहलोत यांना मतदारांनी पसंती दिल्याचे निकालावरून दिसून आले आहे. त्यांनी आपच्या सुरेंद्र भारद्वाज यांना पराभूत केले. या मतदारसंघातही काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. गहलोत हे केजरीवाल यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला होता. करतार सिंह तंवर हे छतरपूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार होते. त्यांनीही विजय मिळवला असून त्यांनी आपच्या उमेदवाराचा पराभव केला. तंवर हे देखील पूर्वी आपमध्ये होते, निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये सामील झाले होते. बदरपूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार नारायण दत्त शर्मा मात्र तंवर यांच्याप्रमाणे यशस्वी ठरले नाहीत त्यांना आपच्या राम सिंह नेताजी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. शर्मा हे आपच्या तिकीटावर 2015 साली आमदार म्हणून निवडून आले होते.