Delhi Rain News: गाढ झोपेत असतानाच मृत्यूने गाठलं! घरावर झाड कोसळून आईसह 3 मुलांचा दुर्दैवी अंत

जाहिरात
Read Time: 2 mins

दिल्ली: राजधानी दिल्लीत सध्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसामुळे झाड कोसळून दिल्लीत एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे.  अपघात दिल्लीतील द्वारका येथे घडला असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या खारखरी कालवा गावात एका शेतात बांधलेल्या ट्यूबवेलच्या खोलीवर एक झाड पडले. या खोलीत एकूण पाच लोक झोपले होते. ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. मृतांमध्ये 26 वर्षीय महिला ज्योतीसह त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे पती अजय किरकोळ जखमी झाला आहे.

दिल्ली अग्निशमन सेवेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "नजफगडमधील खारखारी कालवा गावात घर कोसळल्याची माहिती आम्हाला सकाळी 5.25 वाजता मिळाली. आम्ही घटनास्थळी अनेक पथके तैनात केली आणि ढिगाऱ्यातून चार लोकांना वाचवले.  या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.

(नक्की वाचा-  Phule Movie 'मी स्वतः ब्राह्मण, माझ्याएवढा स्ट्राँग...' फुले चित्रपटावर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा)

दरम्यान, आज जोरदार वाऱ्यामुळे दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक भागात झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याचे वृत्त आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. हवामान खात्याने नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचा आणि अनावश्यकपणे बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, विजेच्या भीतीमुळे कमकुवत इमारतींपासून दूर राहणे आणि मोकळ्या जागेत आश्रय घेणे प्रतिबंधित आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

Advertisement

महत्त्वाची बातमी:  'PM मोदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर, जाता जाता पाकचे 4 तुकडे...' 'सामना'चा लक्षवेधी अग्रलेख!