शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आक्रोश; मंत्र्यांकडे संपत्ती किती, माहिती आहे?

देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. विद्यार्थ्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मंत्री किती संपत्तीचे मालक आहे, याबाबत जाणून घेऊया. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Dharmendra Pradhan Property : देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. विद्यार्थ्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मंत्री किती संपत्तीचे मालक आहे, याबाबत जाणून घेऊया. 

लोकसभा निवडणूक २०२४ दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण चल आणि अचल मालमत्ता तब्बल ६.९२ कोटी रुपये आहे. या संपत्तीत कॅश, बँकेतील पैसे, गुंतवणूक, जमीन, घर, वाहन आणि अन्य संपत्तीचा समावेश आहे. निवडणूक आयोग आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांची संपत्ती वेगवेगळ्या श्रेणीत विभागलेली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्र हे उमेदवाराच्या  आर्थिक स्थितीचं अधिकृत दस्तावेज मानलं जातं. यासाठी यात दिलेली माहिती सार्वजनिक रेकॉर्डचा भाग मानला जातो. यात मतदारांना उमेदवाराच्या आर्थिक स्थितीबाबत पारदर्शक माहिती मिळते आणि राजकीय उत्तरदायित्व देखील मानले जाते. 

Advertisement

जमीन आणि घरांमध्ये किती गुंतवणूक?

धर्मेंद्र प्रधान यांची अचल संपत्तीत निवासी आणि अनिवासी दोन्ही पद्धतीच्या संपत्तीत सामील आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, ओडिशाच्या भुवनेश्वरसह अन्य ठिकाणांवर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर जमीन आणि घरं आहेत. या संपत्तीचं मूल्य वेळेनुसार वाढतं. 

धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर विविध बँक खात्यात मोठी रक्कम आहे. याशिवाय त्यांनी म्यूचयल फंड आणि आरोग्य विमा योजनेतही गुंतवणूक केली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, एसबीआय म्यूचयल फंडसह अन्य आर्थिक साधनांमध्येही गुंतवणूक आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत काय आहे?

धर्मेंद्र प्रधान यांच्या संपत्तीचा मुख्य स्त्रोत खासदारकी आणि केंद्रीय मंत्रीच्या रुपात मिळणारं वेतन आणि भत्ते आहे. याशिवाय बँकेतील रकमेवर मिळणारं व्याज, कृषीशी संबंधित स्त्रोत आणि संपत्तीतून होणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश आहे. निवडणूक कागदपत्रांनुसार, धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्नीदेखील स्वयंरोजगारित असून सामाजिक कार्यात सहभागी आहेत. त्यांच्या उत्पन्नाचा आणि मालमत्तेचा तपशीलही निवडणूक प्रतिज्ञापत्रात समाविष्ट आहे.

५३ लाखांचं कर्ज...

धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात अंदाजे ५३.३७ लाख रुपयांचे दायित्व जाहीर केले आहे. ही रक्कम प्रामुख्याने बँकेची कर्जे आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यांशी संबंधित आहे.

Advertisement

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world