Dhamtari School Incident News : छत्तीसगढच्या धमतरी जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ग्राम कोऱ्हा येथील सिलौटी शासकीय माध्यमिक विद्यालयात एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गमित्रांनाच चावा घेतला. या घटनेमुळं शाळा प्रशासन आणि आरोग्या विभागाची चिंता वाढवली आहे.रिपोर्टनुसार,विद्यार्थ्याने वेगवेगळ्या दिवसांमध्ये 18 मुलांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात चावा घेतला.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सर्व बाधित विद्यार्थ्यांना आरोग्य केंद्रात दाखल करून अँटी रेबिजचे औषध देण्यात आले.विशेष म्हणजे,त्या विद्यार्थ्याला तीन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
विद्यार्थ्यांचा आकडा 18 वर पोहोचला अन्..
हे संपूर्ण प्रकरण धमतरी जिल्ह्यातील ग्राम कोऱ्हा स्थित सिलौटीच्या शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील आहे. अकरावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांना अनेकदा चावा घेतला. सुरुवातीला ही सामान्य घटना असल्याचं बोललं जात होतं. परंतु, जेव्हा विद्यार्थ्यांचा आकडा 18 वर पोहोचला, तेव्हा हे प्रकरण आणखीनच गंभीर बनलं. घटनेची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने तातडीनं आरोग्या विभागाला सूचना दिली.
नक्की वाचा >> Satara News: साताऱ्यातील 'या' प्रसिद्ध शाळेत विद्यार्थ्यांची पळापळ, काही जण गुदमरले, शिक्षकांनाही झाली बाधा
विद्यार्थ्यांना शिक्षकांसोबत आरोग्य केंद्रात पाठवलं
त्यानंतर बाधित विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांसोबत आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं. जिथे त्यांना अँटी रेबिज इंजेक्शन मारण्यात आलं. डॉक्टर जयप्रकाश दिवान यांनी म्हटलं की, रेबिजच्या रुग्णांमध्ये सामान्यपणे पाण्याला घाबरणे, प्रखर प्रकाश आणि आवाजाचा त्रास,भूक न लागणे आणि मानस्थिक स्थिती खराब होणे, अशी लक्षणे दिसतात.परंतु,ज्या विद्यार्थ्याची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये अशाप्रकारचे संकेत मिळाले नाहीत.