ओटीटी प्लॅटफॉर्म पाहणं ही आता चैन नाही तर सवय होत चालली आहे. एकाच सबस्क्रिप्शनमध्ये अनेक जणांना ओटीटीवरील मजकूर पाहण्याची सोय मिळत असल्यानं त्यामुळे युझर्सचा आर्थिक फायदा देखील होत होता. तर ओटीटी कंपन्यांचं नुकसान होत असे. 'नेटफ्लिक्स'नं याबाबत पहिल्यांदा निर्णय घेत पासवर्ड शेअर करण्यास निर्बंध घातले. आता त्यापाठोपाठ
, असं वृत्त 'डेडलाईन' नं दिलंय.
काय आहे नवी योजना?
या योजनेनुसार तुमचा पासवर्ड तुमच्या घराबाहेर जाणार नाही. युझर्सला त्याचा पासवर्ड मित्रांना किंवा अन्य बाहेरच्या व्यक्तींना शेअर करता येणार नाही. यापूर्वी एकाच प्लॅनचा फायदा संपूर्ण मित्रकंपनीला मिळत असे, त्यावर आता निर्बंध येणार आहेत.
हे देखील वाचा : Google सर्च करण्यासाठी मोजावे लागणार पैसे
पासवर्ड शेअरिंगवर निर्बंध घातल्यानंतर सब्सक्राईबरची संख्या वाढेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. एका रिपोर्टनुसार नेटफ्लिक्स कंपनीनं पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातल्यानंतर त्यांना 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत जवळपास 2.2 कोटी नवे सब्सक्राईबर मिळाले आहेत.
नव्या युझर्ससाठी डिस्ने कंपनी नवे प्लॅन आणण्याच्याही तयारीत आहे. युझर्सना घराबाहेर अकाऊंट लॉगिन करण्यासाठी हे प्लॅन असतील. या अकाऊंट्सना खास सुविधा देण्याचाही कंपनीचा विचार आहे.
काय आहेत सध्याचे प्लॅन?
डिस्ने कंपनीचे युझर्ससाठी सध्या तीन प्रकारचे प्लॅन आहेत.
जाहिरातींचा समावेश असलेला पहिला प्लॅन 149 रुपयांचा आहे. या प्लॅनची मुदत 3 महिने आहे. याचे वार्षिक शुल्क 499 रुपये असून तो फक्त एकाच मोबाईलवर पाहाता येतो.
जाहिरातींचा समावेश असलेला दुसरा प्लॅन 899 रुपयांचा आहे. या प्लॅनची मुदत 1 वर्ष असून त्यामध्ये तुम्ही एकाच वेळी दोन डिव्हाईसवर कनेक्ट करु शकता.
प्रीमियम एड फ्री हा जाहिरातींचा समावेश नसलेला एक प्लॅन आहे. त्याचे शुल्क 1499 असून एक वर्षांची मुदत आहे. यामध्ये स्पोर्ट्स सोडून अन्य सर्व कंटेट जाहिरातीशिवाय पाहता येतो. या प्लॅनमध्ये तुम्ही एकाच वेळी चार डिव्हाईस कनेक्ट करु शकता.