जाहिरात
Story ProgressBack

मोठी बातमी : Google सर्च करण्यासाठी मोजावे लागणार पैसे

'लोकल ते ग्लोबल' पातळीवर पडलेल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधण्यासाठी आपण Google ची मदत घेतो. सध्या गूगलकडून ही सुविधा मोफत देण्यात येते. या सुविधेसाठा पैसे मोजावे लागले तर...

Read Time: 2 min
मोठी बातमी : Google सर्च करण्यासाठी मोजावे लागणार पैसे
Google सर्च करण्यासाठीही तु्म्हाला पैसे मोजावे लागू शकतात
मुंबई:

'लोकल ते ग्लोबल' पातळीवर पडलेल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधण्यासाठी आपण Google ची मदत घेतो. सध्या गूगलकडून ही सुविधा मोफत देण्यात येते. या सुविधेसाठा पैसे मोजावे लागले तर... तुम्ही कधी हा विचार केलाय? एखाद्या विषयावर सखोल सर्च करण्यासाठी युझर्सला गूगलला पैसे द्यावे लागू शकतात.

गूगल युझर्ससाठी जेनरेचिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सह प्रीमियम फिचर्स देण्याच्या विचारात आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युझर्सना त्यांचा खिसा रिकामा करावा लागेल.

'फायन्शायल टाईम्स' च्या रिपोर्टनुसार गूगल त्यांच्या युझर्ससाठी अनेक नव्या पद्धतीचे फिचर्स देण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून एआय फिचर्सही रोलआऊट केले जाऊ शकतात. यामधील प्रीमियम फिचर्स वापरण्यासाठी युझर्सला पैसे द्यावे लागतील.

गूगलनं Search Generative Experience बाबत अधिक माहिती दिलेली नाही. त्याचबरोबर ही नवी योजना कधी सुरु होणार आहे, हे देखील स्पष्ट केलेलं नाही. Gemini AI हे फिचर्स गूगलकडं पूर्वीपासूनच आहे. पारंपारिक सर्च करण्यासाठी गूगलचा मोफत वापर यापुढंही करता येईल. या सर्चच्या दरम्यान युझर्सना जाहिराती देखील दिसतील, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

SIP मध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी? 'या' टीप्सचा होईल मोठा उपयोग
 

काय आहेत फिचर्स?

या रिपोर्टनुसार, गूगलच्या प्रीमियम सर्विससाठी युझर्सना पैसे द्यावे लागतील. या प्रीमियम सर्विसमध्ये AI चा समावेश असलेल्या फिचर्सचा समावेश असेल. त्यामुळे युझर्सला नेहमीपेक्षा अधिक उत्तम सर्च करण्यासाठी मदत मिळेल. ChatGPT च्या वाढत्या वापराला उत्तर देण्यासाठी गूगलनंही त्याच्या फिचर्सला एआयची जोड देण्यास सुरुवात केली आहे. गूगलच्या या निर्णयाचे युझर्समध्ये कसे पडसाद उमटतात हे ती लागू झाल्यानंतरच स्पष्ट होईल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination