महिन्याचा पगार झाला की मध्यम वर्गीयांची पावलं आपोआप डी मार्टच्या दिशेने जातात. मध्यम वर्गीयच काय तर आता सर्वच वर्गातल्या लोकांची शॉपिंगची पहिली पसंती ही डी मार्टचं असते. त्यात ही किराणासाठी प्रत्येक जण डी मार्टमध्ये गर्दी करत असतो. त्याला कारण तिथे असलेल्या भन्नाट ऑफर्स आहेत. काही वस्तू ह्या बाहेरील दुकांना पेक्षा निश्चितच कमी दरात मिळतात. त्यामुळे अनेकांचा कल हा डी मार्टकडे असतो. त्या पैकीच एक वस्तू आहे. ती म्हणजे मॅगी. तुम्ही कधी विचार केला आहे का? की मॅगी डी मार्टमध्ये इतर दुकानांच्या तुलनेत स्वस्त का मिळते? त्या मागे एक सिक्रेट लपले आहे. अनेकांना ते सिक्रेट माहित नाही. तेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
इतर किरकोळ दुकानांच्या तुलनेत डी-मार्टमध्ये मॅगी (Maggi) नेहमीच स्वस्त दरात का विकली जाते? तिची छापील किंमत (MRP) जास्त असतानाही कंपनी एवढा मोठा डिस्काउंट कसा देते? यामागील 'डीप डिस्काउंटिंग' आणि प्राईसिंग स्ट्रॅटेजीचे गणित आता समोर आले आहे. व्यापार विश्लेषकांच्या मते, डी-मार्ट 'लो मार्जिन-हाय व्हॉल्यूम' (Low Margin-High Volume) या सूत्रावर काम करते. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या वस्तूमागे कमी नफा कमवायचा, परंतु विक्रीचे प्रमाण प्रचंड ठेवून एकूण नफा वाढवायचा. उदाहरणार्थ, एखादा छोटा दुकानदार रोज 100 मॅगी पॅकेट्स विकून प्रति पॅकेट 5 रुपये नफा मिळवतो. त्यातून त्याची एकूण कमाई 500 रुपये होते. याउलट, डी-मार्ट प्रति पॅकेट फक्त 3 रुपये नफा ठेवून दररोज 1000 पॅकेट्सची विक्री करते, ज्यामुळे त्यांचा एकूण नफा 3000 रुपयांपर्यंत पोहोचतो.
डी-मार्टचे स्टोअर नेटवर्क खूप मोठे आहे. त्यामुळे ते मध्यस्थांना (Wholesalers) वगळून थेट उत्पादन कंपन्यांकडून प्रचंड प्रमाणात (Bulk) माल खरेदी करतात. हा एक त्यांचा मोठा फायदा आहे. यामुळे कंपन्या त्यांना एमआरपीपेक्षा (MRP) खूप कमी दरात वस्तू देतात. याशिवाय डी-मार्टचे मजबूत सप्लाय चेन मॅनेजमेंट त्यांचा लॉजिस्टिक खर्च कमी करते, ज्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळतो. अशा काही मोजक्या वस्तू डी मार्टने हेरल्या आहे. त्या इतर किरकोळ दुकाना पेक्षा कमी दरात दिल्या जाता. याचे मोठे आकर्षण ग्राहकांना वाटते. त्यामुळे ते आपोआप डी-मार्टकडे वळतात.
स्वस्त मॅगी हे केवळ एक प्रॉडक्ट नसून ग्राहकांना स्टोअरकडे आकर्षित करण्याचे एक साधन आहे. ही एक मार्केटींग स्टॅटर्जी आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षक ऑफर दाखवून आपल्याकडे वळवले जाते. त्यात डी मार्ड यशस्वी ठरले आहे. मॅगी स्वस्त मिळते म्हणून आलेला ग्राहक दुधापासून ते चिप्स आणि इतर महागड्या वस्तूही तिथूनच खरेदी करतो. या धोरणामुळे डी-मार्ट केवळ ग्राहकांचा विश्वास जिंकत नाही, तर बाजारातील आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. सध्या डी-मार्टला टक्कर देणारा दुसरा कोणता ही ब्रँड दिसत नाही असा दावा डीमार्टकडूनच केला जात आहे.