जाहिरात

DMart Offer: डी मार्टमध्ये 60 रूपयांच्या 'या' वस्तूसाठी ग्राहकांच्या उड्या, ही खास वस्तू आहे तरी काय?

महिन्याचा किराणा भरायचा असो किंवा घरातील लहान-मोठ्या वस्तूंची खरेदी करायची असो, डी मार्ट हे प्रत्येकाच्या आवडीचे ठिकाण बनले आहे.

DMart Offer: डी मार्टमध्ये 60 रूपयांच्या 'या' वस्तूसाठी ग्राहकांच्या उड्या, ही खास वस्तू आहे तरी काय?

डीमार्ट हे मध्यमवर्गीयांचे शॉपिंगचे हक्काचे ठिकाण झाले आहे. इथं एक वस्तू घेण्यासाठी गेलेली व्यक्ती कधी न कळत चार पाच वस्तू घेईल हे समजत नाही. त्यात जर का डी मार्टमध्ये खास ऑफर्स असतील तर बातच निराळी. मग तर ग्राहकांची इथं झुंबड उडाल्या शिवाय राहत नाही. तशीच काहीशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. स्वस्त आणि मस्त वस्तू म्हटलं की डी मार्टचेच नाव सर्वात आधी समोर येते. सध्या पावसाळ्याच्या दिवसांत छत्री, रेनकोट आणि पावसाळी चपलां व्यतिरिक्त किचनमधील आवश्यक वस्तूंवर मोठी सूट देण्यात आली आहे.

शनिवार आणि रविवारी या दोन दिवसात डी-मार्टमधील गर्दी दुपटीने वाढते. सध्या डिमार्टमध्ये अवघ्या 60 रुपयांना मिळणाऱ्या एका वस्तूची जोरदार चर्चा आहे.  ही वस्तू म्हणजे एक छोटी काचेची बरणी (Glass Jar) आहे.  ग्राहकांचे लक्ष या बरणीने सध्या वेधून घेतले आहे. बाजारात या प्रकारच्या काचेच्या बरण्यांची किंमत अधिक असल्याने ग्राहक डिमार्टमध्ये या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. ही बरणी अत्यंत टिकाऊ आणि बहुउपयोगी असून, त्यात ड्रायफ्रूट्स, मसाले किंवा ऑफिससाठी लागणारे खाद्यपदार्थ सहज ठेवता येतात.

नक्की वाचा- Pune News: सिंहगडावर जाण्यास पर्यटकांना बंदी, 'या' 3 कारणांमुळे घेण्यात आला निर्णय, बंदी किती दिवस?

 या बरण्या खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. भरघोस सवलतीमुळे ग्राहक केवळ एक-दोन नाही, तर थेट 10 ते 15 काचेच्या बरण्या एकाच वेळी खरेदी करत आहेत. याशिवाय विविध आकारांतील प्लास्टिक व स्टीलचे डब्बे, कंटेनर्स आणि स्वयंपाकघरातील इतर साहित्यावरही डिमार्टने विशेष ऑफर्स लागू केल्या आहेत. त्यामुळे सध्या डी मार्टमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. अनेकांना डी मार्डमधील ऑफर्स आकर्षीत करत आहेत. 

नक्की वाचा - Unique Story: एका राज्यात किचन तर दुसऱ्या राज्यात बेडरूम! महाराष्ट्रातल्या 'या' कुटुंबाची मजेशीर कथा

महिन्याचा किराणा भरायचा असो किंवा घरातील लहान-मोठ्या वस्तूंची खरेदी करायची असो, डी मार्ट हे प्रत्येकाच्या आवडीचे ठिकाण बनले आहे. एमआरपीपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या दर्जेदार वस्तूंमुळे येथे ग्राहकांची कायमच गर्दी असते. पावसाळ्याच्या या मोसमात डिमार्टमध्ये केवळ छत्री किंवा रेनकोटवरच नाही, तर स्वयंपाकघरात रोज लागणाऱ्या वस्तूंवरही भन्नाट डिस्काउंट दिला जात आहे. त्यात या बरणीचा ही समावेश आहे. त्यामुळे या बरण्या सध्या मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com