6 व्या मजल्यावर लागली आग, काचा फोडून लोकांनी मारल्या उड्या, पाहा दिल्लीतील भयंकर Video

Delhi Dwarka Fire : घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये अपार्टमेंटची इमारत आगीच्या विळख्यात पूर्णपणे वेढलेली दिसत होती. खिडक्यांमधून आगीचे लोट बाहेर पडत होते

जाहिरात
Read Time: 2 mins
Delhi Dwarka Fire : या आगीमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली:

दिल्लीतील द्वारकामध्ये एका इमारतीला  भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये अपार्टमेंटची इमारत आगीच्या विळख्यात पूर्णपणे वेढलेली दिसत होती. खिडक्यांमधून आगीचे लोट बाहेर पडत होते.  या आगीपासून वाचण्यासाठी एकाच कुटुंबातील तीन जणांनी (दोन मुले आणि वडील) बाल्कनीतून उडी मारली, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 


दिल्ली अग्निशमन सेवा (Delhi Fire Services) ने दिलेल्या माहितीनुसार द्वारका परिसरातील सेक्टर 13 मधील सबद अपार्टमेंटच्या दोन मजल्यांवर ही आग लागली होती. सुरुवातीला यात 2-3 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात ही संख्या जास्त होती. या आगीतून वाचण्यासाठी  दोन मुलांनी (एक मुलगा आणि एक मुलगी, दोघांचे वय 10 वर्षे) स्वतःला वाचवण्यासाठी बाल्कनीतून खाली उडी मारली

Advertisement

या दोन्ही मुलांना आकाश हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले. नंतर त्यांचे वडील यश यादव (वय 35 वर्षे) यांनीही बाल्कनीतून उडी मारली, त्यांनाही IGI रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. ते फ्लेक्स बोर्डच्या व्यवसायाशी संबंधित होते.

( नक्की वाचा :  5 दिवसांपूर्वीच साखरपुडा! व्यापाऱ्याला दुकानात बसल्याजागी आला Heart Attack, पाहा धक्कादायक Video )

या दुःखद बातमीमध्ये एक दिलासादायक बातमी म्हणजे, यश यादव यांची पत्नी आणि मोठा मुलगा आगीतून बचावले असून ते सुखरूप आहेत. त्यांना वैद्यकीय मदतीसाठी IGI रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सोसायटीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे आणि वीज तसेच पीएनजी कनेक्शनसारख्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या संरचनेच्या स्थिरतेचे मूल्यांकन करण्यासाठी डीडीए (DDA) आणि एमसीडी (MCD) यांना माहिती देण्यात आली आहे. कुटुंबाला मदत करण्यासाठी आकाश आणि IGI रुग्णालय दोन्ही ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत.

न्यूज एजन्सी पीटीआय (PTI) च्या रिपोर्टनुसार, सकाळी सुमारे 10 वाजता एका कॉलरने दिल्ली अग्निशमन सेवेला फोन करून एमआरव्ही स्कूलजवळील निवासी अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन विभागाने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 वाहनं बचावकार्यासाठी दाखल झाले. अग्निशमन दलाने जळत्या अपार्टमेंटजवळ स्काय लिफ्टही लावली होती जेणेकरून लोक आत अडकले असल्यास त्यांना बाहेर काढता येईल.
 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world