जाहिरात

5 दिवसांपूर्वीच साखरपुडा! व्यापाऱ्याला दुकानात बसल्याजागी आला Heart Attack, पाहा धक्कादायक Video

Heart Attack Video : एका दुकानात खुर्चीवर बसलेल्या एका तरुणाने पाण्याची बाटली उचलली, पण त्याआधीच त्याला हृदयविकाराचा झटका आला.

5 दिवसांपूर्वीच साखरपुडा! व्यापाऱ्याला दुकानात बसल्याजागी आला Heart Attack, पाहा धक्कादायक Video
Heart Attack Viral Video : घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने सीपीआर देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण...
मुंबई:

मृत्यू हे अटळ सत्य आहे. तो कुणालाही चुकवता येत नाही. पण, हा मृत्यू अकाली आला तर त्यामुळे मृत व्यक्तीच्या प्रियजनांना बसणारा धक्का मोठा असतो. गुजरातमधील सुरुतमध्येही एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. सुरतमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची एक अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सुरतमध्ये एका दुकानात खुर्चीवर बसलेल्या एका तरुणाने पाण्याची बाटली उचलली, पण त्याआधीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. हा तरुण कापड व्यावसायिक होता. आणखी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याचा पाच दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी दुकानात इतर चार लोक उपस्थित होते, पण ते फार काही करू शकले नाहीत. दुकानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने वाहन बोलावले, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्या तरुणाला मृत घोषित करण्यात आले. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात ही हृदयद्रावक घटना कैद झाली आहे.

( नक्की वाचा : काळ आला होता पण... वेगानं वाहणाऱ्या गंगा नदीमध्ये बुडणाऱ्या तरुणाला देवदूतानं वाचवलं! पाहा Video )
 

काय आहे प्रकरण?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील टेक्स्टाईल व्यावसायिक ऋषभ गांधी (वय 27) याचा पाच दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. या कार्यक्रमानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. ऋषभ दुकानात कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित होता. दुकानात नरेंद्र मोदी स्टेडियम आणि इतर काही गोष्टींवर चर्चा सुरू होती.

त्याचवेळी खुर्चीवर बसलेल्या ऋषभने समोर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली, पण तिचे झाकण उघडण्यापूर्वीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने सीपीआर देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ऋषभचा मृत्यू झाला.

हृदयविकाराच्या झटक्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर 27 वर्षांच्या तरुणाचा अखेर कसा मृत्यू झाला, यावर प्रत्येकजण थक्क झाला आहे. तर दुसरीकडे कुटुंबीय धक्क्यात आहेत आणि परिचितांना या घटनेवर विश्वास बसत नाहीये.  हृदयविकाराचा हा संपूर्ण घटनाक्रम काही सेकंदातच घडला. जवळ बसलेल्या मित्रांनाही ऋषभची तब्येत बिघडल्याची पुसटशी कल्पना आली नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com