Recycle जुन्या कपड्याचे मिळतील हजारो रुपये, रक्कम देण्यासाठी माणूस येईल थेट तुमच्या घरी; भारतात 3 वेबसाइट सुरू

How To Recycle Old Clothes For Cash: आता जुन्या कपड्यांमधून तुम्हाला हजारो रुपये मिळू शकतात. भांड्यांच्या बदल्यात जुने कपडे देण्याची आता गरज नाही, कारण नवीन पोर्टल्सच्या माध्यमातून तुम्ही त्यातून चांगली कमाई करू शकता.

जाहिरात
Read Time: 2 mins
"How To Recycle Old Clothes For Cash: जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात मिळतील पैस"
Canva AI

How To Recycle Old Clothes For Cash: आपली आई-आजी जुने कपडे देखील जपून ठेवते आणि नंतर भांडीवाल्याला देऊन त्याबदल्यात एखादे छोटे-मोठे भांडे घेते;हे आपण अनेकदा पाहिले असेल. पण आता असे करण्याची गरज नाही. जर तुमच्याही घरी असे घडत असेल, तर ते त्वरित थांबवा. कारण आता जुन्या कपड्यांमधून तुम्हाला हजारो रुपये मिळू शकतात. जुन्या कपड्यांच्या मोबदलत्यात आता भांडी घेण्याची आवश्यकता नाही. कारण अनेक नवीन पोर्टल्सद्वारे तुम्ही त्यातून पैसे कमावू शकता. या पोर्टल्सवर जुन्या कपड्यांचे रिसायकल (Recycle) किंवा रीसेल (Resale) केले जाते, ज्यामुळे तुम्हाला चांगली किंमत मिळते. जाणून घेऊया या पोर्टल्सबाबतची माहिती... 

या नवीन पोर्टल्सद्वारे मिळतील हजारो रुपये

Freeup, Gletot आणि Etashee यासारखी नवीन 'री-कॉमर्स' (Re-commerce) पोर्टल्स जुने फॅशनेबल कपडे, बॅग्स आणि ॲक्सेसरीज विकण्याची सुविधा उपलब्ध देत आहेत. हे ॲप्स फाटलेले कपडे नव्हे तर चांगल्या स्थितीतील कपडे थेट ग्राहकांना विकून पैसे कमवण्याची संधी देतात. या पोर्टल्सवर तुम्ही तुमचे जुने कपडे देऊन सहजपणे पैसे मिळवू शकता.

Advertisement

(नक्की वाचा: Health Insurance: वाढत्या आरोग्यखर्चाच्या पार्श्वभूमीवर नवीन हेल्थ कव्हर; मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक संरक्षणाचा पर्याय)

  • स्मार्ट बाजार एक्सचेंज: तुम्ही तुमचे जुने कपडे आणि वर्तमानपत्रे येथे देऊ शकता. त्याबदल्यात तुम्हाला प्रति किलोनुसार एक्सचेंज कूपन मिळतील, ज्याचा वापर तुम्ही खरेदीसाठी करू शकता.
  • Freeup, Gletot, Etashee: हे प्लॅटफॉर्म रीसेलसाठी (Resale) आहेत. तुम्ही तुमच्या कपड्यांचे फोटो काढून या पोर्टल्सद्वारे थेट पैसे कमावू शकता.
  • चांगली किंमत: जुन्या साड्या किंवा ब्रँडेड कपड्यांना येथे चांगली किंमत मिळू शकते.
  • पर्यावरण संरक्षण: कपडे कचऱ्यात (Landfill) जाण्याचे प्रमाण कमी होते आणि रिसायकलिंगला चालना मिळते.

पैसे देण्यासाठी माणूस तुमच्या घरी येईल

Freeup, Gletot आणि Etashee या तीनही पोर्टल्सपैकी कोणत्याही पोर्टलवर तुम्ही तुमच्या कपड्यांची माहिती देऊ शकता. माहिती सबमिट केल्यानंतर तुमचे कपडे घेण्यासाठी प्रतिनिधी स्वतः तुमच्या घरी येईल, कपडे घेऊन जाईल आणि तुम्हाला लगेच पैसे दिले जातील. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे.   

Photo Credit: NDTV Marathi