
Anil Ambani ED Raid : आताची मोठी बातमी समोर आली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले मुकेश अंबानी यांचे बंधू Reliance Communications चे चेअरमन अनिल अंबानी (Anil Ambani, Chairman of Reliance Communications) यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही छापेमारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या तब्बल 35 ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनिल अंबानींशी संबंधित कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिसरात देखील चौकशी सुरू आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स होम फायनान्स लि. शी निगडीत मालमत्तांची ईडीकडून झाडाझडती केली जात आहे.
नुकतच एसबीआयने अनिल अंबानी यांना आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनला फ्रॉड घोषित केलं आहे. त्यानंतर आज ईडीकडून अनिल अंबानींच्या विविध ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी सीबीआयने दाखल केलेल्या दोन FIR नंतर करण्यात आली आहे. नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनॅन्शियल रिपोर्टिंग ऑथोरिटी, बँक ऑफ बडोदा आणि सीबीआयनेही यासंदर्भातील माहिती ईडीला दिली होती. प्राथमिक तपासानुसार, येस बँकेने 2017 ते 2019 दरम्यान अनिल अंबानींच्या कंपनीला तब्बल तीन कोटींचं कर्ज दिलं होतं. मात्र त्यांच्यावर आरोप आहे की, हे कर्ज शेल कंपन्या आणि ग्रुपमधील दुसऱ्या कंपन्यांना देण्यात आले आणि तेथून दुसरीकडे वळविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. (Reliance Communications Chairman Anil Ambani declared fraud)
ED raids at multiple premises in over Rs 3,000 cr worth loan 'fraud' case against Anil Ambani group of companies, Yes Bank: Officials. pic.twitter.com/jJMKCKyDhA
— Press Trust of India (@PTI_News) July 24, 2025
काय आहे प्रकरण?
तीन हजार कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात येस बँकेच्या अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये बँकेचे प्रमोटरही होते, अशी माहिती अधिकाऱ्यांच्या तपासात समोर आली आहे. परिणामी येस बँकेच्या कर्ज देण्याच्या प्रक्रियेत गंभीर चुका आढळून आल्या आहेत. कर्जाच्या कागदपत्रावर नंतरच्या तारखा आहेत. व्यवस्थित तपास करण्यात आलेला नाही आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कंपनीला कर्ज देण्यात आलं. कर्जाच्या अटींचं उल्लंघन, कर्ज मंजुरीच्या आधी किंवा त्याच दिवशी पैसे दिले गेले, अशी अनेक प्रकरणं ईडीला आढळून आली आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world