गेल्या काही दिवसांपासून एका लहानग्याने भारतासह संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. त्याचा हा खेळ सर्वांनाच महागात पडत आहे. २०२६ हे वर्ष या लहान मुलामुळे त्रासदायक ठरणार आहे. हा लहान मुलगा आहे अल निनो, ज्याला स्पॅनिशमध्ये द लिटिल बॉय म्हटलं जातं. यावरुन भारतीय हवामान विभागानेही चिंता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने २०२६ मध्ये पाऊस कमी येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामागे हाच लहानगा मुलगा अल निनो आहे. जो सध्या पॅसिफिक महासागराच्या एका लहान भागात विकसित होत आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं.
हवामान विभागाकडून अल निनोने चिंता केली व्यक्त...
भारतीय हवामान विभागानुसार, अल निनो विकसित होत असल्यामुळे २०२६ मध्ये जून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असू शकतो. अल निनो ही हवामानविषयक अशी घटना आहे, ज्यामुळे जगाच्या इतर भागात पर्जन्यमान कमी होऊन दुष्काळ येतो. त्यामुळे पिकांचं नुकसान होतं आणि धान्याचं उत्पन्न घटतं. त्यामुळे अन्न उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
अल निनो काय आहे, कुठे तयार होतो?
अन निनोला द लिटिल बॉयसह क्राइस्ट चाइल्ड म्हटलं जातं. अल निनो ही पूर्व आणि मध्य पॅसिफिक महासागरात घडणारी एक हवामानविषयक घटना आहे. ज्यामुळे पर्यावरणीय चक्र बिघडतं आणि पाऊस आणणारी मान्सून हवा कमकुवत होते. यामुळे मान्सून काळात संपूर्ण भारतीय उपमहाद्वीपमध्ये ममी पाऊस होतो. अल निनो दर २ ते ७ वर्षांदरम्यान विकसित होतो.
अल निनोचा भारतावर काय परिणाम होतो?
सर्वसाधारणपणे समुद्रावरुन उष्ण वारे वाहतात. ते सोबत पाऊस घेऊन येतात आणि इतर प्रदेशात मान्सून येतो. भारतीय उपखंडात जुलै ते सप्टेंबर या काळात मुसळधार पाऊस पडतो. परंतु, जेव्हा अल निनो विकसित होतो. तेव्हा हे उष्ण वारे कमकुवत आणि थंड होतात. ज्यामुळे ते कमी पाणी वाहून नेऊ शकतात. याचा परिणाम मान्सूनवर होतो, जो कमकुवत होतो आणि पावसाचे प्रमाण कमी होते.