1 month ago
नवी दिल्ली:

Election Results 2024 LIVE Updates : हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir Assembly Election Results live updates) विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. मतमोजणीनंतर निकालाबाबतचे चित्र स्पष्ट होऊ लागेल. हरियाणात भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी जम्मू काश्मीरमध्ये (Election Results) काँग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याची आशा बाळगून आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार असून यासाठी लागणारी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी होणाऱ्या ठिकाणांवर तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 

Oct 08, 2024 21:01 (IST)

काँग्रेसला आरक्षण समाप्त करायचं आहे - PM Modi

PM Modi on Election Result : काँग्रेसला सत्ता हा जन्मसिद्ध अधिकार वाटत होता. काँग्रेस जातीवादाचं बी पेरत आहे. काँग्रेसनं दलित आणि मागस वर्गाला घरं आणि जमिनीपासून दूर ठेवलं. आज दलित, मागास आणि आदिवासी जागे होत आहेत. तर काँग्रेसच्या पोटात गोळा उठला आहे. काँग्रेसला दलित आणि मागसवर्गीयांचं आरक्षण समाप्त करायचं आहे. काँग्रेससारखा पक्ष आणि त्याचे चट्टेबट्टे भारत तोडण्याच्या कटात सहभागी आहेत. हरियाणानं त्याचं उत्तर दिलं आहे. भारत विकासाच्या मार्गवरुन भरकटणार नाही.  

Oct 08, 2024 20:42 (IST)

काँग्रेससाठी नो एन्ट्रीचा बोर्ड - PM मोदी

अनेक राज्यात काँग्रेस 60 वर्ष, 50 वर्ष, 40 वर्ष सत्तेपासून दूर आहे.. देशातील अनेक राज्यांनी काँग्रेसला नो एन्ट्रीचा बोर्ड लावला आहे. आता काँग्रेसची पोलखोल झाली आहे. - PM मोदी

Oct 08, 2024 20:38 (IST)

जनादेशाचा आवाज दूरपर्यंत जाईल - PM Modi

हरियाणामध्ये आत्तापर्यंत 13 निवडणुका झाल्या. त्यामध्ये 10 निवडणुकांमध्ये पाच वर्षांनी सरकार बदललं आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ दोनदा पूर्ण केलेल्या सरकारला तिसऱ्यांदा संधी देण्याची हरियाणातील ही पहिली वेळ आहे. या जनादेशाचा आवाज दूरपर्यंत जाईल.

Oct 08, 2024 20:16 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा मुख्यालयात दाखल

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भाजपा कार्यालयात दाखल झाले आहेत. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील यावेळी उपस्थित आहेत. 

Advertisement
Oct 08, 2024 19:00 (IST)

जम्मू काश्मीरच्या निकालावर काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही ट्विट केलं आहे. 

Oct 08, 2024 18:55 (IST)

निवडणूक निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हरियणाच्या मतदारांचे अंत: करणापासून आभार मानले आहेत. 

Advertisement
Oct 08, 2024 18:30 (IST)

'आप'ची आश्चर्यकारक कामगिरी

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला हरियाणा विधानसभेत खातं उघडता आलं नाही. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता असलेल्या आपची हरियणामधील पाटी कोरीच राहिली. पण जम्मू काश्मीरमध्ये आम आदमी पक्षानं एक जागा जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. जम्मू भागातील डोडा मतदारसंघात आम आदमी पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. 

Oct 08, 2024 17:59 (IST)

'नॅशनल कॉन्फरन्सला नष्ट करण्याचे प्रयत्न झाले'

गेल्या पाच वर्षांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न झाले, असा आरोप पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. 'काश्मीरमध्ये अनेक पक्ष तयार करण्यात आले. नॅशनल कॉन्फरन्सला नष्ट करणे हा त्यांचा एकमेव उद्देश होता. आमच्यावर देवाची कृपा कायम होती. आम्हाला ज्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेच या प्रक्रियेत नष्ट झाले,' असं मत ओमर यांनी व्यक्त केलं आहे. 

Advertisement
Oct 08, 2024 17:38 (IST)

काँग्रेस करणार निवडणूक आयोगाकडं तक्रार

हरियाणा विधानसभा निवडणूक निकालानं सर्व एग्झिट पोलचे अंदाज चुकवले आहेत. हरियणातील पराभवामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाला आहे. हा यंत्रणेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे, असं मत पक्षानं व्यक्त केलंय. आम्हाला हा निकाल मान्य नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडं याबाबत तक्रार करणार अशी माहिती काँग्रेस नेते पवन खेडा यांनी दिली आहे. 

Oct 08, 2024 16:50 (IST)

Haryana election Results: नायब सैनी पुन्हा होणार मुख्यमंत्री - सूत्र

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानच भाजपा नेतृत्त्वानं नायब सैनी मुख्यमंत्रीपदी कायम राहणार हे स्पष्ट केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर पक्षाकडून औपचारिक घोषणा करण्यात येईल. 

Oct 08, 2024 16:19 (IST)

पंतप्रधान करणार भाजपा कार्यकर्त्यांना संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7 च्या सुमारास नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात जाणार आहेत. हरियणामधील ऐतिहासिक विजयानंतर ते भाजपा कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहेत. जम्मू काश्मीरमध्येही भाजपानं आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 

Oct 08, 2024 15:45 (IST)

हरियाणात काँग्रेसचं काय चुकलं?

हरियणा विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा काँग्रेस का अपयशी ठरली? काय आहेत काँग्रेसच्या धक्कादायक पराभवाची कारणं?

वाचा : काँग्रेसच्या धक्कादायक पराभवाची पाच प्रमुख कारणं

Oct 08, 2024 15:24 (IST)

हरियाणामध्ये 30 मतदारसंघात चुरशीची लढत

हरियाणामधील 30 विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत सध्या सुरु आहे. या मतदारसंघात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांमध्ये 68 ते 5000 मतांचं अंतर आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक निकालांमध्ये वेगळं चित्र दिसू शकतं.

Oct 08, 2024 15:11 (IST)

हरियाणाचे निकाल काँग्रेससाठी मोठा सेटबॅक

हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी मोठा सेटबॅक आहे, अशी कबुली पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कुमारी शैलजा यांनी दिली आहे. हे निकाल आमच्यासाठी निराशाजनक आहेत. मी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, तसं झालं नाही, असं त्यांनी सांगितलं.

Oct 08, 2024 13:47 (IST)

Jammu kashmir vidhan sabha result : मोठी बातमी! ओमर अब्दुल्ला होणार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, फारुख अब्दुला यांची घोषणा

ओमर अब्दुल्ला होणार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, फारुख अब्दुला यांची घोषणा

Oct 08, 2024 13:23 (IST)

Haryana Election Results : हरियाणा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार?

हरियाणातील पाच जागांवरील निकाल जाहीर, भाजपला आतापर्यंत दोन तर काँग्रेस तीन जागांवर विजयी

Oct 08, 2024 13:06 (IST)

भाजपकडून 100 किलो जिलेबीची ऑर्डर, सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार

भाजपकडून 100 किलो जिलेबीची ऑर्डर, सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार

Oct 08, 2024 12:29 (IST)

Haryana Election Results : हरियाणातील या जागा जिंकल्या तर राज्य जिंकलं, कोणत्या पक्षाने मारली बाजी?

सद्यपरिस्थितीत हरियाणा विधानसभा निवडणुकीत आलेल्या कलांनुसार, भाजप 48 तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय अपक्ष उमेदवारांपैकी अंबालामधीन चित्रा सरवारा 545 मतांनी आघाडीवर आहे. याशिवाय गणौरमधून देवेंदर कडयान, हिसारमधून सावित्री जिंदाल आणि बहादूरगड येथून राजेश जून आघाडीवर आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार हरियाणातील काही महत्त्वपूर्ण जागा जो पक्ष जिंकतो तो राज्यात सत्ता स्थापन करीत असल्याचं म्हटलं जातं. त्यानुसार, बवानी खेडा, कोसली, बडखल, बल्लभगड, फरीदाबाद या मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे.  

Oct 08, 2024 12:19 (IST)

Jammu kashmir vidhan sabha result : जम्मू काश्मीरमधील काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी...

सुचेतगड मतदारसंघातील घारू राम यांना 38,867 मतं मिळाली असून 11,026 मतांनी ते विजयी झाले आहेत. सांबा मतदारसंघातून सूरजीत सिंह यांना 42,206 मतं मिळाली असून ते 29,481 मतांनी विजयी झाले आहेत.  

Oct 08, 2024 12:13 (IST)

Election Result 2024 : मोठी बातमी! जम्मू काश्मीरच्या तीन जागांचे निकाल जाहीर

जम्मू काश्मीरच्या तीन जागांचे निकाल जाहीर

जम्मू काश्मीरच्या तीन जागांचे निकाल जाहीर झाले असून दोन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स आणि एका जागेवर काँग्रेसचा विजय झाला आहे. 

Oct 08, 2024 12:11 (IST)

Jammu kashmir vidhan sabha result : इल्तिजा मुफ्ती बिजबेहरा मतदारसंघातून पिछाडीवर

जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती बिजबेहरा विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. या जागेवरुन नॅशनल कॉन्फरन्सचे बशीर वीरी 5100 मतांनी आघाडीवर आहेत. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा या येथून निवडणूक लढवत आहे. बिजबेहरा हा पीडीपीचा गड मानला जातो. 1996 नंतर ते येथून कधीच निवडणूक हरले नाही. 

Oct 08, 2024 11:57 (IST)

Haryana Election Result : हरियाणातील मुस्लीमबहुल भागातील कल काय सांगतो?

हरियाणातील मुस्लीम बेल्ट फिरोझपूर झिरका मतदारसंघातून काँग्रेसचे मामन खान आघाडीवर आहे. येथे दहा टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली असून ते 64,737 मतांनी आघाडीवर आहेत. हरियाणातील नूह जिल्ह्यातील तीन जागा नूंह, फिरोपूर झिरका आणि पुन्हानामध्ये या मुस्लीमबहुल भागात काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

Oct 08, 2024 11:48 (IST)

विनेश फोगाट अवघ्या 38 मतांनी आघाडीवर

कुस्तीपटू विनेश फोगाट या काँग्रेसकडून जुलाना मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहे. सातवा टप्प्याची मोजणी पूर्ण झाली असून आता हाती आलेल्या कलांनुसार, त्यांना 30,303 मतं मिळाली असून त्या 38 मतांनी आघाडीवर आहेत.  

Oct 08, 2024 11:14 (IST)

&K-हरियाणा निवडणुकीच्या निकालावर पत्रकार व्यंकटेश केसरी यांचं विश्लेषण

Oct 08, 2024 11:11 (IST)

बडगाममध्ये ओमर अब्दुल्ला 1400 मतांनी आघाडीवर..

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेता ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) दोन्ही जागांवरुन आघाडीवर आहेत. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये बडगाममधून ओमर अब्दुल्ला 1400 मतांनी आघाडीवर आहेत. 49 जागांवर काँग्रेस एनसीची युती आघाडीवर आहे. यात 23 जागांवर भाजप आघाडीवर असून 15 जागांवर अपक्ष आणि दोन जागांवर पीडीपी आघाडीवर आहेत.   

Oct 08, 2024 10:48 (IST)

Haryana Election Results : हरियाणातील भाजपचे सर्वात तरुण उमेदवार पिछाडीवर...

हरियाणातील सर्वात तरुण उमेदवार आदमपूर मतदारसंघातील भाजपचे भव्य बिश्नोई पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. 

Oct 08, 2024 10:36 (IST)

Jammu kashmir vidhan sabha result : जम्मू काश्मीरच्या ताज्या कलांनुसार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला स्पष्ट बहुमत

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या ताज्या कलांनुसार, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. येथे काँग्रेस आणि  नॅशनल कॉन्फरन्स एकूण 48 जागी आघाडीवर आहे. तर भाजपची 28 जागांवर आघाडी आहे. यामध्ये पीडीपी चार जागा तर अपक्ष 10 जागी आघाडीवर आहे.  


Oct 08, 2024 10:31 (IST)

Vidhan Sabha Result Live : हरियाणात काँग्रेस-भाजपातलं अंतर वाढलं

हरियाणात काँग्रेस-भाजपातलं अंतर वाढलं. आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 48 जागी आघाडीवर असून आयोगानुसार काँग्रेसला 34 जागांवर आघाडी आहे.

Oct 08, 2024 10:29 (IST)

हरियाणातून काँग्रेसला धक्का देणारी बातमी, कुस्तीपटू विनेश फोगाट पिछाडीवर

हरियाणातून काँग्रेसला धक्का देणारी बातमी, कुस्तीपटू विनेश फोगाट पिछाडीवर

Oct 08, 2024 09:51 (IST)

Hisar Vidhan Sabha : सावित्री जिंदल आघाडीवर..

बांगडमधील सर्वात हॉट सीट हिसारमध्ये भाजपने मंत्री डॉ. कमल गुप्ता यांना पाचव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. डॉ. गुप्ता आरोग्य व शहर विकास मंत्री आहेत. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल आणि स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनी कमल गुप्ता यांचा प्रचार केला होता. या जागेवर काँग्रेसकडून रामनिवास राडा यांचं आव्हान आहे. 

देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल (Savitri Jindal) या जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून मैदातान उतरल्या आहेत. सध्याच्या कलांनुसार सावित्री जिंदाल हिसारमधून आघाडीवर आहेत. या जागेवर वैश्य समाजाच्या मतांमध्ये विभाजन झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2005 मध्ये ओम प्रकाश जिंदल यांच्या निधनानंतर सावित्री जिंदाल राजकारणात दाखल झाल्या आणि दोन वेळा आमदार आणि मंत्री राहिल्या आहेत. मात्र 2014 च्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्या राजकारणापासून दूर होत्या. यंदा अपक्ष म्हणून त्यांनी राजकारणात वापसी केली आहे.   

Oct 08, 2024 09:44 (IST)

Vidhan Sabha Result Live : चित्र पालटलं, जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस 49 तर हरियाणात काँग्रेस 41 जागाच्या आघाडीवर...

चित्र पालटलं, जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस 49 तर हरियाणात काँग्रेस 41 जागाच्या आघाडीवर...

 

Oct 08, 2024 09:19 (IST)

हरियाणाचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणारे भाजपचे अनिल विज पिछाडीवर

हरियाणाचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणारे भाजपचे  अनिल वीज पिछाडीवर 

Oct 08, 2024 09:08 (IST)

Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा? हरियाणा अन् जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीवर

हरियाणा अन् जम्मू काश्मीर या विधानसभा निकालावर राहुल गांधींचा करिष्मा दिसल्याचं चित्र आहे.  हरियाणा अन् जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीवर असून हरियाणात तर बहुमताचा आकडा पार केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस 42, भाजप 27 आणि पीडीपी 7 जागांवर आघाडीवर आहे. तर हरियाणात काँग्रेस 54 जागांवर, भाजप 25 जागांवर तर INLD 3 जागांवर आघाडीवर आहे.  

Oct 08, 2024 09:00 (IST)

हरियाणात काँग्रेसने बहुमताचा आकडा केला पार

हरियाणात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला. 

Oct 08, 2024 08:48 (IST)

Haryana Election Results : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आघाडीवर

हरियाणाच्या रोहतकच्या सांपला-किलोई विधानसभा जागा चर्चेत आहे. या जागेवर काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा मैदानात आहेत. सध्याच्या निकालानुसार ते या जागेवरुन आघाडीवर आहेत. भाजपकडून या जागेवर मंजू यांनी निवडणूक लढवली आहे. तर आम आदमी पक्षाकडून परवीन स्पर्धेत आहे. भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी या जागेवरुन चारवेळी निवडणूक लढवली आहे. 

2019 मध्ये भूपेंद्र हुड्डा 97,755 मतांसह विजयी झाले होते. त्यावेळी भाजपचे सतीश मंडल यांना 39,443 मतं मिळाली होती. या निवडणुकीत दहा उमेदवार होते. 

Oct 08, 2024 08:33 (IST)

Vidhan Sabha Result Live : कोण आघाडीवर अन् कोण पिछाडीवर?

मतमोजणीच्या 30 मिनिटांपर्यंत आलेल्या निकालांनुसार हरियाणात काँग्रेस 30 तर भाजप 20 जागांच्या आघाडीवर आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये भाजप 18 तर काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे. त्याशिवाय पीडीपी एक आणि इतर एक जागांवर आघाडीवर आहे. 

Oct 08, 2024 08:24 (IST)

Haryana Election Results : कुस्तीपटू विनेश फोगाट यांची जादू दिसणार?

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांपैकी जुलाना मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगाट (Wrestler Vinesh Phogat) यांनी निवडणूक लढवली आहे. काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली आहे. विनेश फोगाट यांच्यासाठी ही जागा अवघड होती. कारण गेल्या निवडणुकीत काँग्रेस या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर होती. यावेळी पक्षाला तब्बल १२ टक्के मतदान झालं होतं. जेजेपीचे अमरजीत ढांडा यांनी येथून निवडणूक लढवली होती. त्यामुळे विनेश फोगाट यांच्याकडून काँग्रेसला अपेक्षा आहेत.

Oct 08, 2024 08:14 (IST)

Haryana Election Results : हरियाणात काँग्रेस 12, भाजप 10 जागांची आघाडी

पहिल्या टप्प्यात पोस्टल बॅलेजची मोजणी सुरू झाली आहे. यानुसार हरियाणातील 90 विधानसभा जागांमध्ये काँग्रेस 12, भाजप 10 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. 

Oct 08, 2024 08:12 (IST)

Jammu kashmir vidhan sabha result : जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसने खातं उघडलं

जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसने खातं उघडलं. 90 जागांपैकी दोन जागांवर काँग्रेस तर एका जागेवर भाजप आघाडीवर...

Oct 08, 2024 08:08 (IST)

ओमर अब्दुल्ला गड वाचवू शकणार?

जम्मू काश्मीरच्या गांदरबलमधून ओमर अब्दुल्ला यांनी निवडणूक लढवली होती. या जागेवर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीचा उमेदवार म्हणून ओमर अब्दुल्ला यांनी निवडणूक लढवली होती. तर दुसरीकडे महबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली. 

Oct 08, 2024 08:02 (IST)

अनु्च्छेद 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा सरकार स्थापन होणार

जम्मू-काश्मीरमध्ये अनु्च्छेद 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा सरकार स्थापन होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये 90 विधानसभा जागांसाठी मतमोजणी होणार आहे. जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा हटवल्यानंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. 

Oct 08, 2024 07:46 (IST)

Haryana Election Results : हरियाणाच्या 90 जागांचा आज फैसला

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झालं होतं. आज मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. हरियाणाच्या 90 जागांसाठी 464 अपक्ष, 101 महिलांसह एकूण 1,031 उमेदवार मैदानात आहेत.  

Oct 08, 2024 07:38 (IST)

Jammu kashmir vidhan sabha result : जम्मू काश्मीरमध्ये भाजपचे सरकार येण्याचा विश्वास

Oct 08, 2024 07:32 (IST)

Assembly Election Results 2024: सकाळी 8 वाजता हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

पुढील काही मिनिटात हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. 

Topics mentioned in this article