जम्मू- काश्मिर: जम्मू- काश्मिरमध्ये भारतीय लष्कराचे जवान आणि आतंकवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे समोर आले आहे. या चकमकीत 5 आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे तर भारतीय सैन्याचे दोन जवान जवान जखमी झाले आहेत. या चकमकीनंतर भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जम्मू- काश्मिरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्करांच्या जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत भारतीय जवानांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे तर या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुलगामच्या बेहीबाग भागात ही चकमक सुरू आहे. दोन दहशतवाद्यांच्या माहितीवरून जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने ऑपरेशन सुरू केले होते. चकमकीदरम्यान त्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले. ऑपरेशन अजूनही सुरु असून आणखी दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे.
पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाला परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय लष्कराने कुलगाममध्ये संयुक्त कारवाई सुरू केली.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील चकमकी वाढल्या आहेत ज्यामध्ये अनेक दहशतवादी आणि त्यांचे कमांडर मारले गेले आहेत. या चकमकींमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे जवानही जखमी झालेत. काश्मीरमधील श्रीनगर आणि जम्मूमधील चिनाब खोरे, उधमपूर आणि कठुआमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा थरारक Video समोर