कामाच्या अतिरिक्त तणावातून इंजिनिअरने आयुष्य संपवलं, मृतदेहाजवळ चिठ्ठीही सापडली

कार्तिकेयन मानसिक तणावात होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. कार्तिकेयन कामाच्या अतिरिक्त तणावामुळे मानसिक तणावात होते, अशी देखील माहिती समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुण्यात कामाच्या अतिरिक्त तणावातून अॅना सबॅस्टियन या 26 वर्षीय सीए तरुणीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. असाच एक प्रकार चेन्नईमधून समोर आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. कार्तिकेयन असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ज्यावेळी कार्तिकेयन यांनी हे टोकाचं पाऊल उचललं त्यावेळी घरात कुणीही नव्हतं. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकेयन यांनी स्वत:ला इलेक्ट्रिक शॉक देऊन संपवलं. गुरुवारी कार्तिकेयन यांच्या पत्नी जयाराणी घरी आल्या तेव्हा ही सर्व घटना समोर आली. कार्तिकेयन पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलासोबत चेन्नईमध्ये राहत होते. कार्तिकेयन मागील 15 वर्षांपासून एका सॉफ्टवेअर कंपनी टेक्निशियन म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वीच ते नवीन कंपनीत रुजू झाले होते.  

(नक्की वाचा: ऑफिसमधील अतिरिक्त ताणामुळे तरुणीचा मृत्यू? पुण्यातील प्रसिद्ध EY कंपनीवरील आरोपामुळे देशभरात खळबळ)

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी जयाराणी या थिरुनल्लूर मंदिरात गेल्या होत्या. मुलाला त्यांनी आईच्या घरी सोडलं होतं. जयाराणी घरी परतल्या त्यावेळी दरवाजा बराच वेळ वाजवून देखील कुणीच उघडला नाही. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. मात्र दरवाजा उघडल्यानंतर जे चित्र त्यांना दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. कार्तिकेयनचा मृतदेह विद्युत तारेला चिकटलेला आढळून आला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळवलं. 

(नक्की वाचा-  Anna Sebastian Perayil : अ‍ॅनाच्या मृत्यूमागचे गूढ आता उलगडणार, केंद्रीय मंत्र्याने उचलले मोठे पाऊल)

मानसिक तणावात होते कार्तिकेयन

कार्तिकेयन मानसिक तणावात होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. कार्तिकेयन कामाच्या अतिरिक्त तणावामुळे मानसिक तणावात होते, अशी देखील माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. कार्तिकेयन यांना एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरु आहे. कार्तिकेयन यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटदेखील सापडली आहे. यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 
 

Advertisement

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Topics mentioned in this article