EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, रक्कम थेट बँक खात्यात मिळणार, 'ही' आहे प्रक्रिया

ईपीएफओकडे सध्या अशा 31.86 लाख खात्यांमध्ये एकूण 10,903 कोटी रुपये पडून आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • EPFO 3.0 योजना सुरू केली असून, १,००० रुपयांपेक्षा कमी पीएफ शिल्लक स्वतःहून बँक खात्यात जमा केली जाईल
  • सरकारच्या नव्या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना कोणतेही अर्ज न करता थेट व्हेरिफाईड बँक खात्यात पीएफ पैसे मिळणार आहेत
  • ईपीएफओच्या नव्या प्रणालीमुळे क्लेम सेटलमेंटचा कालावधी ७२ तासांवर कमी करण्यात आला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली आहे. अनेकदा कर्मचारी जुनी नोकरी सोडल्यानंतर जुन्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यास विसरतात. अशा प्रलंबित रक्कमेसाठी आता सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, ज्या खात्यांमध्ये 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम आहे, ती रक्कम सरकार स्वतःहून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

या नव्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची किंवा अर्ज भरण्याची गरज भासणार नाही. तुमचे पीएफ पैसे थेट तुमच्या व्हेरिफाईड बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. तसेच, ईपीएफओच्या नव्या प्रणालीमुळे क्लेम सेटलमेंटचा कालावधी कमी होऊन तो आता केवळ 3 दिवसांवर आला आहे. ईपीएफओच्या नियमांनुसार, ज्या पीएफ खात्यात सलग 36 महिने (3 वर्षे) कोणताही नवा हिस्सा जमा होत नाही, ते खाते 'इनऑपरेटिव्ह' मानले जाते. 

Advertisement

नक्की वाचा - Vigilance Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरी पैशांची 'खाण'!, रोकड अन् सोन्याचा ढीग मोजता मोजता अधिकारी थकले

ईपीएफओकडे सध्या अशा 31.86 लाख खात्यांमध्ये एकूण 10,903 कोटी रुपये पडून आहेत. पहिल्या टप्प्यात 1,000 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली 7.11 लाख खाती निवडण्यात आली असून, त्यातील 30.52 कोटी रुपये थेट कर्मचाऱ्यांना परत दिले जाणार आहेत. अनेकजण छोटी रक्कम असल्याने पीएफ काढण्याचा कंटाळा करतात, यामुळे हजारो कोटी रुपये ईपीएफओकडे पडून आहेत. आता सरकारने हे पैसे थेट खातेदारांना देण्याचे अभियान हाती घेतले आहे. 

नक्की वाचा - Shocking news: नोकरीचे आमिष, ड्रग्ज अन् धर्मांतर! सख्ख्या बहिणींच्या काळ्या साम्राज्याची हादरवून टाकणारी कहाणी

इतकेच नाही, तर आता पीएफ क्लेम अवघ्या 72 तासांत (3 दिवसांत) सेटल होणार आहे. यामुळे तातडीच्या वेळी पैशांची गरज असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने अशा 7.11 लाख खात्यांची ओळख पटवली आहे. ज्यामध्ये 1,000 रुपयांपेक्षा कमी शिल्लक आहे. या मोहिमेमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या खिशात हक्काचे पैसे विनासायास परत येणार आहेत. जर तुमचे खाते 3 वर्षांपासून बंद असेल, तर आता तुमच्या मोबाईलवर लवकरच पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो.

नक्की वाचा - Holi News: होळीला बाजारात नकली रंगाची भरभराट! 'अशी' करा खऱ्या- खोट्या रंगाची ओळख