EPFO Update: कर्मचाऱ्यांची मजा! मोठं टेन्शन मिटलं, आता थेट ATM आणि UPI द्वारे काढता येणार पीएफचे पैसे

विनाविलंबत आणि तातडीने कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे पैसे मिळावेत हाच यामागील मुख्य हेतू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • केंद्र सरकारने जून २०२६ पासून पीएफ खातेधारकांसाठी थेट ATM आणि UPI द्वारे पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे
  • या नव्या सुविधेमुळे नोकरदारांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत
  • कर्मचाऱ्यांना ७५ टक्के पीएफ रक्कम एटीएम आणि UPI द्वारे काढता येणार आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

नोकरदारांसाठी एक दिलासा देणारी घटना घडली आहे. देशात कोट्यवधी नोकरदार आहे. त्यांच्या दृष्टीने एक अत्यंत आनंदाचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता अडचणीच्या स्थितीत भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ (PF) मधून सहज पैसे काढता येणार आहेत. त्यासाठी पीएफ ऑफीसचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. केंद्र सरकारने पीएफ खातेधारकांसाठी थेट ATM आणि UPI द्वारे पैसे काढण्याची अत्यंत सोपी आणि हायटेक सुविधा सुरू केली आहे. चालू महिन्यापासून म्हणजेच June 2026 पासून ही सुविधा देशभरात लागू होणार आहे. त्यामुळे नोकरदारांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे. 

​गेल्या अनेक महिन्यांपासून कामगार मंत्रालय आणि EPFO या विशेष बाबीवर पुर्ण ताकदीने काम करत होतं. कर्मचाऱ्यांना दिलासा देणं आणि पैसे काढण्याची सुविधा सहज आणि सोपी व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. या प्रणालीच्या सर्व तांत्रिक चाचण्या आता यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती सरकारने दिली आहे. श्रम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चालू महिन्यापासूनच कर्मचारी कोणत्याही त्रासाशिवाय आपल्या गरजेनुसार UPI आणि ATM द्वारे पीएफ खात्यातून पैसे काढू शकतील. यामुळे पैशांची निकड असलेल्या कर्मचाऱ्यांना काही मिनिटांतच रोख रक्कम उपलब्ध होणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - Shivsena Crisis: उद्धव ठाकरेंना धक्का! ऑपरेशन टायगर यशस्वी? बैठकीला 'एवढेच' खासदार उपस्थित

​केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी काही महिन्या पूर्वीच  या क्रांतिकारी निर्णयाचे संकेत दिले होते. EPFO ला पूर्णपणे हायटेक आणि डिजिटल बनवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आणीबाणीच्या किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पीएफ धारकांना पैशांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यात ही पैसे उशिरा किंवा कधी कधी मिळत ही नव्हते. हा त्रास परत होवू नये यामुळे सरकारने हा निर्णय घेतला  आहे. 

Operation Tiger: ठाकरेंचे खासदार कुठे लपले? लोकेशन सापडलं? सुरत- गुवाहाटी नव्हे 'या' ठिकाणी मुक्काम

विनाविलंबत आणि तातडीने कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे पैसे मिळावेत हाच यामागील मुख्य हेतू आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही पूर्ण पीएफचे पैसे एटीएममधून काढू शकता का? तर त्याचे उत्तर आहे नाही. नोकरदार त्यांच्या पीएफमधून एकूण 75 टक्के रक्कमच एटीएम किंवा युपीआय द्वारे काढता येणार आहेत. जर शंभर टक्के पैसे काढायचे असतील तर त्याला पूर्वीचेच नियम लागू आहेत. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ खात्यातून (PF Account) पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि वेगवान करण्यात आली आहे.