Marathi language: मराठी भाषेच्या प्रचारासाठी निबंध लेखन- मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत विविध वयोगटांसाठी तीन गट आणि वैविध्यपूर्ण विषय ठेवण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

मराठी भाषेचा प्रसार आणि विकास व्हावा यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध लेखन आणि मराठी  भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 1 ऑक्टोंबर 2025 आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 25 रुपये शुल्क आकारले जाईल, आणि दोन्ही परीक्षा  प्रत्येकी दोन तासांच्या असतील. 

स्पर्धेत विविध वयोगटांसाठी तीन गट आणि वैविध्यपूर्ण विषय ठेवण्यात आले आहेत. गट क्र. 1 (12 ते 16 वर्षे, 150-500 शब्द) मध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर - एक अलौकिक व्यक्तिमत्त्व, ‘खेळामुळे मिळणारे जीवनाचे धडे, ‘माझी आई सर्वकाही, हे विषय आहेत. गट क्र. 2 (17 ते 30 वर्षे, 500-1000 शब्द) मध्ये ‘यशासाठी आहार आणि विहार, ‘फेक बातम्या व सूचनांचा अतिभार - एक गंभीर विषय', ‘मराठी भाषेचा वापर हीच मराठी भाषेची जपणूक आहे' हे विषय देण्यात आले आहेत. गट क्र. 3 (1000-1500 शब्द) मध्ये ‘पुण्यश्लोक देवी आहिल्यादेवी होळकर यांची राष्ट्रभक्ती, ‘कुंभमेळा: एक महान परंपरा की भ्रमंती ‘धर्म आणि विज्ञान - मित्र की शत्रू  हे विषय आहेत. 

नक्की वाचा - CIDCO News: घरांच्या किंमत कमी करण्याबाबत सिडको सकारात्मक, 22 हजार घरांची लॉटरी ही लवकरच

मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट या स्पर्धेद्वारे साध्य केले जाणार आहे. मराठी परीक्षेच्या पाच स्तरांमध्ये परिचय, प्राज्ञ, मध्यमा, कोविद प्रथम आणि कोविद द्वितीय यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी किंवा अर्ज भरण्यासाठी संपर्क साधावा: परीक्षा कार्यालय, 56-बी, वैशाली नगर, इंदूर - 4552009. फोन: 8329423864,7389293997. इच्छुकांनी त्वरित अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेने केले आहे.  दिल्ली व दिल्लीच्या आसपास परिसरासाठी केंद्र प्रमुख  शशी कुलकर्णी  (मो.क्र 9868023064) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.