Success Story : 2 कोटींची नोकरी सोडली अन् बनली Youtuber!, आता कमावते 8 कोटी रुपये

Youtuber Nischa Shah : निशा शाहचं 'Nischa' नावाचं यूट्यूब चॅनेल आहे. ज्यावर 1.18 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. यूट्युबच्या माध्यमातून निशा शहा आजच्या घडीला तिच्या पगाराच्या 4 पट कमाई करते.

जाहिरात
Read Time: 3 mins

'वो जीना भी कोई जीना है, जिसमें किक न हो', सलमान खानचा 'किक' सिनेमातील डायलॉग निशा शहा या तरुणीने चांगलाच मनावर घेतला. त्यामुळेच निशाने 2 कोटी पगाराच्या नोकरीवर लाथ मारली आणि यूट्युबर बनली. मात्र अशी-तशी नाहीतर तर यशस्वी यूट्युबर बनली. कारण 2 कोटींची नोकरी सोडणारी निशा आता चौपट म्हणजे तब्बल 8 कोटी रुपयांची कमाई करत आहे.   

इनवेस्टमेंट बँकर ते यूट्युबर

पर्सनल फायनान्स यूट्यूबर निशा शाहची करिअरची वाटचाल अत्यंत रंजक आहे. अनेक वर्ष इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून निशाने नोकरी केल. लंडनमधील बँकर क्रेडिट ॲग्रिकोलमध्ये सहयोगी संचालक म्हणून ती अखेरची नोकरी करत होती. तिथे तिला 2 कोटी वार्षिक पगार होता. गलेलठ्ठ पगार आणि कंपनीत मानाचं स्थान तरीही निशाचं मन काही तिच्या त्या कामात रमत नव्हतं. तिला तिचं काम करताना फारशी मजा येत नव्हती. तिला ती नोकरी आव्हानात्मक वाटत नव्हती.  

निशाने याबाबत म्हटलं की, कॉर्पोरेटमध्ये नोकरी करताना मला जवळपास 9 वर्षे झाली होती. तिथे मला आव्हानात्मक काही वाटत नव्हतं. मला पैसे कमावत इतरांना मदत करण्याचा मार्ग शोधायचा होता. मी बँकिंगमध्ये जे काही करत होते त्याची कॉर्पोरेट, इतर कंपन्यांना मदत करत होत होती, निशा शाह हिने एका मुलाखतीत सांगितले.

Nicha Shah

यूट्युबवर पदार्पण

पर्सनल फायनान्स क्षेत्रातील तिची आवड पूर्णवेळ व्यवसायात बदलण्यासाठी तिने प्रयत्न सुरु केले. तेव्हा तिला यूट्युबर हा पर्याय सापडला. अनेक दिवस याबाबत तिने बराच रीसर्च केला. त्यानंतर तिने डिसेंबर 2021 मध्ये यूट्युबवर पदार्पण केलं. 

निशाने पर्सनल फायन्सास आणि सेल्फ डेव्हलपमेंटवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. तिने तिच्या इनवेस्टमेंट बँकिंगच्या कमाईतून व्हिडीओ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी केली. त्यानंतर दोन महिन्यांनंतर जानेवारीमध्ये तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसांत तिला लाखो रुपयांचा बोनस कंपनीकडून मिळणार होता. मात्र आपल्या आवडीच्या कामासाठी तिने त्यावरही पाणी सोडलं. 

Advertisement

यूट्युबवर 4 मिलियनहून अधिक सबस्क्रायबर्स

निशा शाहचं 'Nischa' नावाचं यूट्यूब चॅनेल आहे. ज्यावर 1.18 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. यूट्युबच्या माध्यमातून निशा शहा आजच्या घडीला तिच्या पगाराच्या 4 पट कमाई करते. जून 2022 मध्ये, तिने आठवड्यातून दोनदा व्हिडिओ पोस्ट करण्याचे ठरवले आणि एक इवेस्टमेंट बँकर म्हणून डेली लाईफ पोस्ट करणे सुरू केले. निशा तिच्या यूट्युब प्रवासाबाबत सांगते की, "मला 1000 सबस्क्रायबर्स होण्यासाठी 11 महिने लागले आणि नंतर 100,000 पर्यंत जाण्यासाठी दोन महिने लागले." 

Nicha Shah

आता निशा तिच्या YouTube व्हिडिओंची मॉनिटाईझ करुन, कोर्सेसद्वारे आणि विविध प्रोडक्ट्स विकून, कॉर्पोरेट चर्चा आणि ब्रँडसह भागीदारी करून वर्षाला 8 कोटी रुपये कमवते. निशा शहा विविध प्रकारचे व्हिडीयो करते, ज्याचा विविध स्तरातील लोकांना फायदा होत आहे. पैशांचं नियोजन, कोणत्या सवयी तुम्हाला गरीब ठेवतात, गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी, पर्यायी उत्पन्न अशा विविध विषयांवर तिने केलेले व्हिडीओ गाजले आहे.  निशाच्या व्हिडीओंना मिलियन्समध्ये व्ह्युज मिळतात, ज्यामुळे पर्सनल फायनान्स क्षेत्रातील ती विश्वासार्ह व्यक्ती बनली आहे.

Advertisement

निशाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अनेकांना आपल्या नोकरीचा कंटाळा आला, त्यांना आपल्या मनासारखं काहीतरी करायचंय. अशांसाठी निशा शहा उत्तम उदाहरण आहे. उंच भरारी घ्यायची तर फांदी सोडावीच लागते, हे निशाने दाखवून दिलंय. निशाच्या या यशस्वी प्रवासातून अनेकांच्या पंखांना बळ मिळेल, हे मात्र नक्की. 

Topics mentioned in this article