Explainer: अश्लील व्हिडिओ स्कँडलमध्ये अडकले माजी पंतप्रधानांचे नातू, तक्रार दाखल होताच का सोडला देश?

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातूवर झालेल्या आरोपांमुळे कर्नाटकातील राजकारण तापलं आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा अडचणीत सापडले आहेत.
मुंबई:

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडाचे नातू प्रज्वल रेवण्णा Karnataka MP Prajwal Revanna) यांच्यावर लैंगिक शोषणाची (sexual assault) तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेवण्णा हे जेडीएस पक्षाचे विद्यमान खासदार आणि हसन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. रेवण्णा यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ते कथितरित्या काही महिलांसोबत चुकीचं वर्तन करत असल्याचं दिसत आहेत. रेवण्णा यांनी हा हा व्हायरल व्हिडिओ मॉर्फ केल्याचा दावा करत सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. याच दरम्यान हसनमधील मतदान 26 एप्रिलला संपताच रेवण्णा जर्मनीत गेले आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.  

देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्याशी संबंधित असलेलं हे सेक्स सँक्डल काय आहे हे पाहूया

कधी समोर आला व्हिडिओ?

प्रज्वल रेवण्णा यांच्याशी संबंधित असलेली ही व्हिडिओ क्लिप हसन लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हायरल झाली आहे. हसन लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान झालं. कर्नाटकातील सत्तारुढ सिद्धरामय्या सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची नियुक्ती केली आहे. महिला आयोगाच्या शिफारशीनंतर SIT ची स्थापना करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रेवण्णांवर काय आरोप आहेत?

या स्कँडलमधील व्हिडिओ खासदारांनीच शूट केल्याचा कथित आरोप आहे. हसन लोकसभा मतदारसंघात तो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. त्यानंतर एका महिलेनं रविवारी प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत होलेनरसीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 2019 ते 2022 दरम्यान अनेकदा लैंगिक शोषण झाल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. 

भाजपा नेते देवराजे गौडा  2023 साली होलेनरासिपूरमधून विधानसभा मतदारसंघातील उमेदवार होते. आपण गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णासह एचडी देवेगौडा यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केल्याचा दावा केलाय. 

Advertisement

( नक्की वाचा : 'लव्ह जिहादमुळे मुलीची हत्या', कर्नाटकातील काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप )

देवराज गौडा यांनी त्यांना पेन ड्राईव्ह मिळाल्याचा दावा केला होता. त्यामध्ये महिलांचे 2976 व्हिडिओ होते. या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून महिलांना ब्लॅकमेल केलं जातं होतं. त्यांच्यावर सेक्सुअल एक्टिविटीसाठी बळजबरी करण्यात येत होती. 'आपण जेडीएससोबत युती केली आणि आगामी लोकसभा निवडणुकीत हसनमध्ये जेडीएसचा उमेदवार दिला तर या व्हिडिओचा ब्रह्मास्त्राप्रमाणे आपल्याविरोधात वापर केला जाऊ शकतो. ज्या कुटुंबातील सदस्यावर बलात्काराचा आरोप आहे त्यांच्या पक्षाशी युती केल्याचा डाग आपल्यावर लागेल. राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या प्रतिमेला यामुळे धक्का बसेल,' असं देवराजे यांनी दावा केला होता. 

प्रज्वल रेवण्णांनी काय स्पष्टीकरण दिले?

33 वर्षांच्या प्रज्वल रेवण्णा यांनी हा व्हिडिओ फेटाळला आहे. त्यांनी आपल्याला बदनाम करण्यासाठी व्हिडिओमध्ये छेडछाड केल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. रेवण्णा शनिवारी सकाळी जर्मनीत रवाना झाले आहेत. प्रज्वल रेवण्णा यांचे वडील एचडी रेवण्णा याांच्यावरही त्यांच्या घरातील सहाय्यिकेनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलाय. एचडी रेवण्णा होलेनरासिपूरमधून JDS चे आमदार आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : देशभरातील WhatsApp बंद होणार? वाचा कंपनीनं कोर्टात काय सांगितलं? )
 

भाजपाची भूमिका काय?

प्रज्वल रेवण्णा यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन कर्नाटकात राजकीय वादळ उठलंय. भाजपा-जेडीएसमध्येही यावरुन वाद सुरु झालाय. कथित स्केस टेपवरील वादापासून भाजपानं स्वत:ला दूर केलंय. 'एक पक्ष म्हणून आमचा या व्हिडिओशी काहीही संबंध नाही. प्रज्वल रेवण्णांशी संबंधित कथित सेक्स स्कँडलवर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या SIT बाबतही आम्हाला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही,' असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ता एस. प्रकाश यांनी स्पष्ट केले. 

JDS मध्ये मतभेद

रेवण्णा यांच्या प्रकरणावर त्यांच्याच पक्षात दोन वेगळी मतं उघड झाली आहेत. प्रज्वल रेवण्णांचे काका आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या प्रकरणाची चौकशी होण्याची आम्ही वाट पाहात आहोत, असं सांगितलं. हे काम ज्यांनी केलंय त्याला माफ करण्याचा प्रश्न नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement

तर, जेडीएसचे दुसरे नेता शारंगौडा कांडकूर यांनी प्रज्वल रेवण्णा यांना निलंबित करण्याची मागणी केलीय. त्यांनी सोमवारी सकाळी दोन पानांचं पत्र सार्वजनिक केलंय. 'JDS ची या व्हिडिओमुळे बदनामी झालीय. त्यामुळे तुमच्या आणि पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय,' असं कांडकूर यांनी म्हंटलंय. 

काँग्रेसचा भाजपावर आरोप

काँग्रेसनं या प्रकरणात भाजपाला लक्ष्य साधलंय. या कथित सेक्स क्लिपच्या गदारोळात प्रज्वल रेवण्णाला देशातून पळून जाण्यात भाजपानं मदत केलीय, असा काँग्रेसचा आरोप आहे. रेवण्णा यांना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी काँग्रेसचे नेते तसंच कार्यकर्त्यांनी  बंगळुरुमध्ये निदर्शनंही केली.
 

Topics mentioned in this article