Viral VIDEO: "साहेब 15 वर्ष झाले, आता गाडी बदला"; माजी मुख्यमंत्र्यांना चाहत्याचा सल्ला, नव्या गाडीचं नावही सांगितलं

अशोक गहलोत यांच्या चाहत्याने म्हटलं की, "आतातरी तुम्ही निळ्या किंवा काळ्या रंगाची 'डिफेंडर' गाडी घ्या. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तेव्हा सर्वात आधी गाडी बदला."

जाहिरात
Read Time: 2 mins

Viral Video: राजस्थानच्या राजकारणात एक खुमासदार आणि मजेदार किस्सा समोर आला आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपला गाड्यांचा ताफा रस्त्यात काही लोकांना पाहून अचानक थांबवला. गाडी थांबताच, एक उत्साही चाहता धावत अशोक गहलोत यांच्याजवळ पोहोचला आणि त्याने जे काही सांगितले, ते ऐकून स्वतः गहलोतही थक्क झाले.

अशोक गहलोत यांचा चाहता म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणा त्याने सांगितलं की, "साहेब, मी तुम्हाला मागील 15 वर्षांपासून पाहत आहे. तुम्ही प्रत्येक वेळी याच गाडीत दिसता. तोच नंबर, तीच गाडी. हल्ली छोटे-मोठे नेतेही 3 ते 4 महिन्यांत आपली गाडी बदलतात. पण तुमच्याकडे अजूनही तीच जुनी गाडी आहे. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. आतातरी तुम्ही निळ्या किंवा काळ्या रंगाची 'डिफेंडर' गाडी घ्या. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तेव्हा सर्वात आधी गाडी बदला."

(नक्की वाचा- Political News: माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार? अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?)

पाहा VIDEO

अशोक गहलोत काय म्हणाले?

अशोक गहलोत यांनी हसत हसत उत्तर दिले, "या गाडीत काय वाईट आहे? आरामदायक आहे." चाहत्याने तातडीने उत्तर दिलं की, "नक्कीच आरामदायक असेल साहेब, पण आता स्टाईलही महत्त्वाची आहे. हल्ली नेत्याची ओळख गाडीवरून होते. तुमची ओळख तशीही आहेच, पण आता एक आलिशान 'लूक' पण असायला हवा."

(नक्की वाचा - Rajnath Singh: 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण)

हे ऐकून गहलोत हसू लागले आणि म्हणाले की, "अरे भाई, राजकारण गाडीने नव्हे, तर कामातून होते." या गप्पांनंतर तिथे उपस्थित असलेले लोकही हसण्यात सामील झाले. त्या चाहत्याने पुढे सांगितले की, तो जयपूरमध्ये 15 वर्षांपासून चहाचे दुकान चालवतो. तसेच अशोक गहलोत यांना 'डिफेंडर' गाडीत बसलेले पाहण्याचे त्याचे स्वप्न आहे.

Advertisement

Topics mentioned in this article