आणीबाणी जाहीर झाली त्यावेळी सोनिया गांधी पंतप्रधानांच्या घरात होत्या! भाजपा नेत्याचा दावा

Sonia Gandhi : दिवगंत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणीबाणी लादण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सोनिया गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या, असा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sonia Gandhi
मुंबई:

दिवगंत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणीबाणी लादण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सोनिया गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या, असा दावा मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. काँग्रेस आणि 'इंडिया आघाडी' च्या नेत्यांनी संसदेच्या आवारात राज्यघटनेची प्रत घेऊन संसदेच्या आवारात प्रवेश केला. त्यावर टीका करताना मिश्रा यांनी हा आरोप केला.

काँग्रेसचा खरा चेहरा

'ज्या दिवशी इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लावली त्यादिवशी सोनिया गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या. आज त्या त्यांच्या मुलासह (राहुल गांधी) राज्यघटनेची प्रत हाती घेत आहेत. हा काँग्रेसचा खरा चेहरा आहे,' असं नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं. भाजपानं आणिबाणी काळातील मेंटेनेंस ऑफ इंटर्नल सिक्युरेटी अ‍ॅक्ट (MISA) विरोधात लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात मिश्रा बोलत होते.

मिश्रा पुढं म्हणाले की, 'काँग्रेस सरकारच्या राजवटीमधील 70 वर्षात 100 पेक्षा जास्त वेळा राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात आली. आता ही मंडळी खोटे दावे करुन लोकांची दिशाभूल करत आहेत. '

( नक्की वाचा : 3 वेळा फोन...खर्गेंचा अपमान केल्याचा राहुल गांधींचा आरोप! राजनाथ यांनी दिलं उत्तर )
 

इंडिया आघाडीचे नेते राज्यघटनेच्या संरक्षणाचा  दावा करत आहेत. पण प्रत्यक्षा ते सर्वजण त्यांच्या मुलाचं राजकीय भविष्याचं संरक्षण करत आहेत,' असा टोला त्यांनी लगावला.

'ज्या लोकांनी तो काळा कालखंड पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी भाजपा आणीबाणीचं सत्य सांगेल,' अशी माहिती मिश्रा यांनी दिली. 

Topics mentioned in this article