नवी दिल्ली:
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने आज 26 डिसेंबर रोजी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 92 वर्षी मनमोहन सिंग यांना रुग्णालयातील आपत्कालिन विभागात हलवण्यात आलं आहे. सिंग यांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांची तब्येत खालावल्यानंतर तातडीने आपत्कालिन विभागात दाखल करण्यात आलं. साधारण रात्री 8 च्या सुमारास माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना AIIMS मध्ये आणण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांना फुप्फुसाचा संसर्ग आहे. सध्या डॉक्टरांच्या टीमकडून त्यांची तपासणी सुरू आहे.