देशातील सर्वात मोठी डिजिटल फसवणूक; 8 कोटींची गंडा, माजी IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Digital Fraud News: अमर सिंग चहल हे 2015 मधील बहुचर्चित फरीदकोट गोळीबार प्रकरणातील (बेहबल कलान आणि कोटकपुरा) आरोपी आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

पंजाब पोलीस दलातून पोलीस महानिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी अमर सिंग चहल यांनी सोमवारी दुपारी आपल्या छातीत गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या घराच्या परिसरातून पोलिसांना 12 पानांची सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला एका ऑनलाइन गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढून 8.10 कोटी रुपयांना लुटल्याचा खुलासा केला आहे.

काय आहे सुसाईड नोटमध्ये?

अमर सिंह चहल यांनी पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात आपली व्यथा मांडली आहे. त्यांना व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरील एका बनावट गुंतवणूक ग्रुपद्वारे शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या फसवणुकीत त्यांनी स्वतःचे 1 कोटी आणि नातेवाईक व मित्रांकडून उसने घेतलेले सुमारे 7 कोटी रुपये गमावले.

(नक्की वाचा-  महायुतीत दोस्तीत कुस्ती! पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या NCP ला शह देण्यासाठी भाजप-शिंदेंची सेना एकत्र)

फसवणुकीची पद्धत

सायबर ठगांनी त्यांना बनावट 'डॅशबोर्ड' दाखवून नफा होत असल्याचे भासवले. मात्र, जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना 'सर्व्हिस फी' आणि 'टॅक्स'च्या नावाखाली अधिक पैसे भरण्यास भाग पाडले गेले.

या सगळ्याच्या तणावातून अमर सिंग चहल यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गोळी छातीत लागल्याने चहल यांना तातडीने पटियाला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फुफ्फुसाजवळ अडकलेली गोळी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती अजूनही अत्यंत चिंताजनक आहे.

Advertisement

फरीदकोट गोळीबार प्रकरणातील आरोपी

अमर सिंग चहल हे 2015 मधील बहुचर्चित फरीदकोट गोळीबार प्रकरणातील (बेहबल कलान आणि कोटकपुरा) आरोपी आहेत. 2023 मध्ये पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणात माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर सिंह बादल यांच्यासह चहल यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

(नक्की वाचा-  Palghar News : भाजपच्या विजयी नगरसेवकांच्या मिरवणुकीदरम्यान दोन महिलांना मारहाण; दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू)

पटियालाचे एसएसपी वरुन शर्मा यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगार किती सराईत झाले आहेत, की निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाही त्यांनी आपल्या जाळ्यात ओढले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी चहल यांनी आपल्या चिठ्ठीत केली आहे. पोलीस सध्या या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article