इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इंडिया एआय अभियानांतर्गत ‘युवा एआय फॉर ऑल' हा पहिला विनामूल्य अभ्यासक्रम सुरु केला आहे. सर्व भारतीयांना- विशेषतः तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगाशी ओळख करून घेता यावी, हा याचा उद्देश आहे. हा कोर्स एकूण 4.5 तासांचा असून आपल्या सोईनुसार तो पूर्ण करता येईल. विद्यार्थी, व्यावसायिक आणि अन्य जिज्ञासू व्यक्तींना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूलभूत संकल्पना समजावून सांगण्यासाठी हा कोर्स तयार करण्यात आला आहे. सोप्या पद्धतीने एआयची माहिती समजावी या उद्देशाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगात कसे परिवर्तन घडून येत आहे, याचीही कल्पना यातून येईल.
नक्की वाचा: हिवाळ्यात 30 दिवस रिकाम्या पोटी गाजर, बीट आवळ्याचा ज्युस प्यायल्यास कोणते आजार ठीक होतील?
AI चा मोफत कोर्स कुठे आणि कसा करता येईल ?
FutureSkills Prime, iGOT Karmayogi आणि अन्य लोकप्रिय शैक्षणिक संकेतस्थळांसारख्या आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर हा कोर्स उपलब्ध आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला भारत सरकारकडून एक अधिकृत प्रमाणपत्र मिळणार आहे. या कोर्सचे सहा भाग आहेत.
AI कोर्सचे सहा भाग असे आहेत
- कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय? आणि ते कसे काम करते
- शिक्षण, सर्जनशीलता आणि काम यांबाबत कृत्रिम बुद्धिमत्ता कसे बदल घडवत आहे
- कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा सुरक्षित आणि जबाबदार वापर
- भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची सोपी आणि सहज उदाहरणे
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संधींवर दृष्टिक्षेप टाकणे
'Yuva AI For All' कोर्स केल्यास काय फायदा होईल?
हा अभ्यासक्रम 100% विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला आहे
शिकणाऱ्यास स्वतःच्या सोयीनुसार शिकता येते- तेदेखील कोठेही, कधीही.
विद्यार्थ्यांना भारत सरकारचे प्रमाणपत्र मिळेल
कोर्स करणाऱ्याला भविष्यातील संधींसाठी सज्ज होता येईल
कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम राष्ट्र म्हणून घडविण्यात योगदान देता येईल
नक्की वाचा: हयगय नको! प्रत्येक पुरुषाने 'या' 5 आरोग्य तपासण्यात केल्याच पाहिजे
1 कोटी नागरिकांना AI चे शिक्षण देण्याचे उद्दीष्ट्य
या उपक्रमाअंतर्गत 1 कोटी नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देऊन कुशल बनविण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. AI चे मूलभूत शिक्षण देऊन नागरिकांना सक्षम करण्याचा या कोर्सद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हा अभ्यासक्रम पोहोचवण्यासाठी संस्था, शाळा, आणि विद्यापीठे इंडिया एआयशी संलग्न होऊ शकतात.
AI च्या निशुल्क कोर्ससाठी वेबसाईट
पुढील संकेतस्थळावर हा अभ्यासक्रम उपलब्ध असेल-: https://www.futureskillsprime.in/course/yuva-ai-for-all/