Car Mileage Rules: कारचं मायलेज कसं चेक करायचं? AC चालू ठेवून, की बंद करून? सरकारचा मोठा निर्णय

हवामानामुळे एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि मायलेज कमी होते. युरोपीय मानकांचा दाखला देत कंपन्या आतापर्यंत ही माहिती लपवत होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

AC on Mileage Rules: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कार उत्पादक कंपन्यांना त्यांच्या वाहनांचे मायलेज सांगताना, एअर कंडिशनिंग (AC) सिस्टिम सुरू असताना आणि बंद असताना अशा दोन्ही स्थितीतील इंधन कार्यक्षमतेची (Fuel Efficiency) माहिती देणे अनिवार्य होणार आहे.

एसी ऑन करुन होणार मायलेज टेस्ट

येत्या १ ऑक्टोबर २०२६ पासून भारतात उत्पादित होणाऱ्या किंवा आयात केल्या जाणाऱ्या सर्व कारसाठी हा नियम लागू करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाने मांडला आहे.​ सध्याच्या नियमांनुसार, कार कंपन्या केवळ एसी बंद असतानाच्या चाचणीचे मायलेज ग्राहकांना सांगतात. मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर वाहन चालवताना उन्हाळ्यामुळे किंवा हवामानामुळे एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि मायलेज कमी होते. युरोपीय मानकांचा दाखला देत कंपन्या आतापर्यंत ही माहिती लपवत होत्या.

Crime News: 4 महिन्यांपूर्वी लव्हमॅरेज, तरुणी 2 मुलांसोबत बेडरुममध्ये, पतीने पाहिलं अन्... भयंकर घटना!

काय आहे सरकारचा निर्णय?

मात्र, रस्ते वाहतूक मंत्रालयाने आता 'AIS-213' हे नवीन मानक निश्चित केले आहे. या अंतर्गत एसी लोडसह इंधन वापर आणि उत्सर्जनाची अचूक मोजणी केली जाईल. ​हा नियम केवळ पेट्रोल-डिझेल गाड्यांनाच नव्हे, तर इलेक्ट्रिक वाहनांनाही (EV) लागू असेल. ईव्हीच्या बाबतीत एसी सुरू असताना बॅटरीची रेंज किती कमी होते, याची स्पष्ट माहिती आता ग्राहकांना मिळणार आहे.

ही माहिती वाहनाच्या 'युजर मॅन्युअल'मध्ये आणि कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असेल. यामुळे ग्राहकांची फसवणूक थांबेल आणि त्यांना अधिक वास्तववादी माहितीच्या आधारे वाहन खरेदीचा निर्णय घेता येईल, असा विश्वास मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

Advertisement

Pune News : पुण्यातील व्यापाऱ्याची ATM पिनसाठी निर्घृण हत्या..मास्टरमाईंडला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Topics mentioned in this article