जाहिरात

Pune News : पुण्यातील व्यापाऱ्याची ATM पिनसाठी निर्घृण हत्या..मास्टरमाईंडला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

झारखंड पोलिसांनी एक संघटित गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करून संटू कुमार उर्फ कुंदन या आरोपीला अटक केली आहे. अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Pune News : पुण्यातील व्यापाऱ्याची ATM पिनसाठी निर्घृण हत्या..मास्टरमाईंडला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
Pune Businessman Murder Case
पुणे:

Shocking Crime News : झारखंड पोलिसांनी एक संघटित गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करून संटू कुमार उर्फ कुंदन या आरोपीला अटक केली आहे. अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे सराईत गुन्हेगार अपहरण आणि हत्यांसारखे गंभीर गुन्हे करायचे,अशी माहिती आहे. गेल्या वर्षी पुण्यातील एका व्यापाऱ्याला स्वस्त मालाचे आमिष दाखवून पाटण्याला बोलावलं होतं.त्यानंतर त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. लक्ष्मण साधू शिंदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं. 

भाड्याच्या घरातून चालवायचे सायबर फ्रॉडचे रॅकेट

रामगडसह सायबर क्राईम पथकाने संयुक्त कारवाई करत शनिवाली संटू कुमार उर्फ सिंटू उर्फ कुंदनला अटक केली. आरोपी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी संटू बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पुण्याचा व्यापारी लक्ष्मण साधू शिंदे यांच्या हत्येच्या प्रकरणात वाँटेड क्रिमिनल होता. पोलिसांच्या माहितीनुसार,आरोपी रामगडहच्या गोला पोलीस स्टेशन हद्दीतील हेरमदगा गावात एका भाड्याच्या घरात राहून सायबर फ्रॉडचे रॅकेट चालवत होता. 

नक्की वाचा >> New Mayor Of Mumbai : कोण होईल मुंबईचा नवा महापौर? भाजपच्या 'या' 5 नगरसेवकांची दिवसरात्र चर्चा

त्या गँगचे काळे कारनामे उघड 

पोलिसांनी आरोपी संटूकडून 3 आयफोनसह एकूण 6 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या फोनमध्ये बोगस सिम कार्ड लावले होते. तसच 4.43 लाख रुपयांची रोकड,बिहार नंबरची काळ्या रंगाची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.चौकशीदरम्यान, संटूने पोलिसांना सायबर फ्रॉड, संघटित गुन्हेगारी करणाऱ्या रॅकेटबाबत माहिती दिली. संटूने कबूल केले की, तो बँकेचा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून लोकांना फसवायचा आणि खोट्या आश्वासनांनी त्यांच्या मोबाइलमध्ये बनावट APK फाइल डाउनलोड करायला लावायचा. या फाइलमुळे त्या व्यक्तीचा फोन पूर्णपणे त्याच्या टोळीच्या नियंत्रणाखाली राहयचा. त्यानंतर ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम लंपास केली जात असे.

नक्की वाचा >> BMC Mayor Election : 'Mumbai Boss' चा सस्पेन्स कधी संपणार? कशी असते महापौरपदाची लॉटरी सिस्टम? वाचा सर्व माहिती

पुण्याच्या व्यापाराची हत्या केली अन्..

पोलीस तपासात असंही उघडकीस आलं की, त्यांची टोळी व्यापाऱ्यांना खोट्या मीटिंगचे आमिष दाखवून बोलावायटे आणि त्यांचे अपहरण करून खंडणी वसूल करायचे. गेल्या वर्षी पुण्यातील व्यापारी लक्ष्मण साधू शिंदे यांनाही झारखंडच्या कोल इंडिया कंपनीच्या नावाने बनावट ईमेल पाठवून स्वस्तात स्क्रॅप मिळेल, असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याला पटण्याला बोलावण्यात आलं होतं. त्याने एटीएम पिन सांगण्यास नकार दिल्यावर त्याला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com